शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू महिलांना धमकावणारा गजाआड, कारपेंटर बनून करायचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 09:49 IST

सुतारकाम करण्याच्या बहाण्याने करायचा कॉल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये लँडलाइनवर कॉल करून तेथील महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला गावदेवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इम्तियाज अब्दुल खुर्दुस अन्सारी (४९)  असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

इम्तियाज पेडर रोड येथील एका व्यावसायिक महिलेच्या घरी लँडलाइनवर कॉल करून धमकावत होता. याप्रकरणी महिला व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी खंडणी, विनयभंग व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.  कुर्ला कमानी येथील रहिवासी असलेल्या अन्सारीविरोधात धमकावणे, खंडणी, विनयभंग अशा १९ गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणातील ३२ वर्षीय तक्रारदार महिला घाटकोपर येथील रहिवासी असून व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपीने २४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत तक्रारदार यांच्या मोबाइलवर तसेच त्यांच्या मालकिणीच्या राहत्या घरातील लँडलाइनवर सतत फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार यांना बलात्कार व हत्या करण्याची धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने साकीनाका काजूपाडा परिसरातून आरोपीला अटक केली.

 असे हेरायचा महिलांना चौकशीदरम्यान, अन्सारी पेडर रोड, बिडी रोड, नेपियन सी रोड, मलबार हिल, जुहू, गावदेवी, बांद्रा परिसरात विविध उच्चभ्रू लोकांच्या घरात लँडलाइनवर दूरध्वनी करून सुतारकाम करायचे असल्याचे सांगून माहिती घेत असे. त्यानंतर तेथे महिला आढळल्यास वारंवार दूरध्वनी करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत असल्याचे समोर आले. त्याचा मोबाइल ताब्यात घेत पोलीस अधिक  तपास करत आहेत. तो असे का करत होता? त्याने आतापर्यंत किती महिलांना कॉल करून त्रास दिला? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई