शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांकडूनच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा; टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात स्टाफसह केला आनंद साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:13 IST

माजलगाव तालुक्यात डॉ.देशपांडेनी उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठळक मुद्देमाजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल

माजलगाव :  शहरातील देशपांडे हॉस्पिटल येथील कोरोना संशयित डॉक्टर व स्टाफ यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याच्या आनंदच्या भरात डाक्टरांनी आणि स्टाफने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवत ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा केला. यामुळे माजलगाव शहर पोलिसात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील देशपांडे हॉस्पिटल मध्ये दि.२ जुन ते ४ जून या कालावधीमध्ये धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ६५ वर्षाचा एक वयोवृद्ध रूग्ण आजारी असल्याने उपचार घेत होता .या उपचारादरम्यान संशयित रुग्ण हा मुंबईवरून आल्याने प्रशासनास कळले. यावर सदरील रुग्णाचे कोरोणा स्टेस्ट घेतली असता तो पॉझिटिव आढळला होता. त्यामुळे  देशपांडे हॉस्पिटल डॉक्टरसह सर्व कर्मचारी स्टाफ व हॉस्पिटल सील करण्यात आले होते. परंतु आज दि.११ दुपारी २ वाजता देशपांडे हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्‍यांसह डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटलच्या बाहेर ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यात जिल्हाधिकारी यांच्या कोरोणाच्या परिस्थितीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिग चे कोणतेही नियम न पाळता अनेक लोक एकत्र करून जमवुन डॉ.देशपांडेसह इतरांनी नाचत हा आनंद उत्सव केला. 

याप्रकरणी डॉ.गजानन देशपांडे, डॉ. श्रेयस देशपांडे यांचासह १२ जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अंबादास अनंत बेले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, तपास पोलिस नाईक बीटी राऊत हे करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड