शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच व्हिसा घोटाळा; सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 05:51 IST

व्हिसा कर्मचाऱ्यांनी याकरिता या तरुणांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये स्वीकारत त्यांना कौन्सुलेटच्या मुख्याधिकाऱ्याच्या परवानगीशिवायच व्हिसा जारी केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फ्रान्सच्या व्हिसासाठी सादर झालेली कागदपत्रे बनावट असल्याचे ठावूक असूनही अर्जदारांकडून पैसे घेत त्यांना व्हिसा जारी केल्याप्रकरणी चार अर्जदार आणि फ्रान्स वकिलातीमधील दोन भारतीय कर्मचाऱ्यांवर सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. 

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथील चार तरुणांना फ्रान्समध्ये रोजगारासाठी जायचे होते. परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी मुळात तिथे नोकरी लागल्याचे पत्र तसेच संबंधित कंपनीकडून नोकरी मिळालेल्या व्यक्तीच्या नावे व्हिसासाठी पत्र दिले जाते. मात्र, या तरुणांकडे असे कोणतेही पत्र नव्हते. तरीही या तरुणांनी बंगळुरू येथील एका कंपनीने त्यांची नेमणूक फ्रान्स येथील कार्यालयात केल्याचे बनावट पत्र सादर करत व्हिसासाठी अर्ज केला होता. तसेच, व्हिसा कार्यालयातील दोघांशी संगनमत केले.

व्हिसा कर्मचाऱ्यांनी याकरिता या तरुणांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये स्वीकारत त्यांना कौन्सुलेटच्या मुख्याधिकाऱ्याच्या परवानगीशिवायच व्हिसा जारी केला होता. तसेच, कालांतराने या अर्जदारांची कागदपत्रे असलेली फाईल गहाळ केली होती. अशा पद्धतीने बनावट व्हिसा जारी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. हा घोटाळा १ जानेवारी २०२२ ते ६ मे २०२२ या कालावधीमध्ये झाला आहे. या प्रकरणी सीबीआयने तपासाअंती बनावट व्हिसा प्राप्त करणारे चार अर्जदार आणि व्हिसा कार्यालयातील दोन कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

घोटाळ्याची व्याप्ती मोठी ?फ्रान्स व्हिसा कार्यालयातील ज्या दोन व्यक्तींवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांच्या व्हिसा अर्जाची हाताळणी केल्याचे सीबीआयच्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांची आता कसून चौकशी केली जात आहे. या दोघांनी अनेक लोकांना कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्याशिवायच व्हिसा जारी केल्याचा सीबीआयला संशय आहे.