शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगून महिलेची चौदा लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:37 IST

Crime News : आरोपी आनंद कबीर आणि त्याची महिला साथीदार या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन पनवेल :  दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकारी यांनी पकडले असल्याचा बनाव करून, दोघांनी महिलेची १४ लाख दोन हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. आरोपी आनंद कबीर आणि त्याची महिला साथीदार या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोडपाली, कळंबोली सेक्टर २० येथे राहणाऱ्या सीमा बावा यांनी मार्च, २०२० मध्ये जीवनसाथी डॉट कॉमवर अकाउंट उघडले होते. तेव्हा त्यांची भेट कबीर आनंदशी झाली. ३० सप्टेंबर रोजी आनंद कबीरने तो दिल्ली एअरपोर्टला आला असून, त्यांच्यासोबत एक कोटी युरो सोबत आणल्याचे सीमा यांना सांगितले, तसेच त्याला दिल्ली एअरपोर्टवर कस्टम ऑफिसरांनी एक करोड युरो इतक्या रकमेसह पकडले असून, टॅक्स भरण्यासाठी सांगत असल्याचे सांगितले. यावेळी महिला कस्टम ऑफिसरने त्यांना सोडविण्याकरिता व टॅक्स भरण्याकरिता पैशांची मागणी केली. सीमा बावा यांनी त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठविले. यावेळी महिला कस्टम अधिकारी सतत वेगवेगळ्या मोबाइल फोनवरून सीमा यांच्याशी संपर्क करून टॅक्स, फी आणि कस्टम ड्युटी भरण्यास सांगत होती. सीमा बावा यांनी १४ लाख २ हजार ७०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. एवढे पैसे पाठवूनही ते अजून सीमा बावा यांच्याकडे पैशाची मागणी करत असल्याने त्यांना त्यांचा संशय आला. त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात आनंद कबीर व त्याची महिला साथीदार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जीवनसाथी डॉट कॉमवरून घातली लग्नाची मागणीसीमा बावा यांना कबीर आनंद यांनी ते स्पेन येथे राहण्यास असून, युनिसेफ या ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले, तसेच व्हाॅट्सअपवर त्यांनी फोटो पाठवून त्याच्या आई-वडिलांची ओळख करून दिली आणि सीमा यांना लग्नाबाबत विचारले व तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मग दिल्लीला आलो आहोत असे सांगत कस्टम ऑफिसर महिलेच्या नावाने पैसे उकळून कस्टम ड्युटी भरण्यास सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी