शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचे घराचे आमिष दाखवून फसवणूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 21:23 IST

कैलास कृष्णा चवरकर, गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतीक वसंत थोरात यांचा समावेश आहे.

मुंबई – म्हाडाच्या फ्लॅटचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीस काल गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अब्ररार अहमद युसूफ असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील अब्ररार हा सहावा आरोपी असून यापूर्वी याच गुन्ह्यात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात कैलास कृष्णा चवरकर, गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतीक वसंत थोरात यांचा समावेश आहे.या टोळीने आतापर्यंत 70 ते 80 जणांना म्हाडाचे बोगस दस्तावेज देऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. खार परिसरात काहीजण म्हाडाच्या फ्लॅटची बनावट विवरणपत्रे आणि इतर बोगस दस्तावेज तयार करून एका व्यक्तीला देण्यासाठी येणार आहे, अशी माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने खार आणि वांद्रे येथून मोहम्मद नासीरसह तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अब्ररार याचे नाव आले होते. अब्ररार हा भंगार विक्रेता असून तो म्हाडाचा एजंट म्हणून काम करीत होता. त्यानेच अनेकांना आरोपींकडे घरासाठी आणले होते. त्यांच्याकडून घेतलेले पैसे त्याने आरोपीपर्यंत पोहचविले होते. त्यात त्याला काही रकमेचे कमिशन मिळाले होते.तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई