शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातच उकळले पावणेपाच लाख; सरकारी नोकरी देतो सांगून महिलेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 09:47 IST

विलास गमरे, अरविंद पवार या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मंत्रालयीन कर्मचारी असल्याचे भासवून दोघांनी एका महिलेला आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवत पावणेपाच लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्यालयाचे बनावट नियुक्ती पत्र देत विलास गमरे आणि अरविंद पवार या भामट्यांनी मंत्रालयातच पैसे घतले.  त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भांडुपमधील ४५ वर्षीय तक्रारदार महिला नोकरीच्या शोधात असताना, एका व्यक्तीने त्यांना जुलै २०२२ मध्ये मंत्रालयात लिपिक पदावर भरती सुरू असून, विलास गमरे हे काम करून देतील, असे सांगितले. या महिलेने पतीसह  मंत्रालयात गमरे याची भेट घेतली. गमरेने लिपिक पदाच्या नोकरीसाठी मराठी टायपिंग शिकण्यास सांगत दोन लाख रुपये मागितले. आठवडाभराने तक्रारदार महिलेने पतीसह  मंत्रालयात चौथ्या मजल्यावरील आरोग्य विभागात जात गमरेला पैसे  दिले. तसेच, टायपिंग शिकायला सुरुवात केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये गमरेने महिलेची अरविंद पवारशी ओळख करून दिली. पवारने मंत्रालयातच संगणकावर सुचिता यांची दोनदा टायपिंग परिक्षा घेतली. त्यानंतर गमरे आणि पवारने पुढचे काम करण्यासाठी आणखी ७५ हजार रुपये घेतले आणि अधिवेशन झाल्यानंतर नोकरीचे काम होईल, असे सांगितले.

  1. फेब्रुवारी २०२३ मध्ये टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या पतीने नोकरीचा पाठपुरावा वेगाने सुरू केला, तेव्हा ६ मार्च २०२३ रोजी गमरे याने महिलेला दूरध्वनी करत सरकारी आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी लागल्याचे पत्र देतो, असे सांगत त्यांच्याकडून आणखी दोन लाख रुपये उकळले. 
  2. विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्यालय आवार या नावाने सरळ सेवेने नियुक्तीबाबतचे पत्रही दिले. त्यांची १७ एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी पार पडली. त्यानंतर दोघांनी कॉल घेणे बंद केल्याने तक्रारदार महिला आणि पतीने आरोग्य विभागात चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडील नियुक्ती पत्र खोटे असल्याचे समोर आले.
  3. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने मरिन ड्राइव्ह पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, पोलिस तपासात विलास गमरेविरुद्ध अशाच प्रकारे फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.
टॅग्स :Mantralayaमंत्रालयfraudधोकेबाजी