शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्डच्या मदतीने फसवणूक, महिला डॉक्टरच्या खात्यातून 70 लाख लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 14:50 IST

Fraud : महिलेने जेव्हा आयकर विवरणपत्र भरले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली : आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. बँक खाते उघडण्यापासून ते प्रत्येक सरकारी कामापर्यंत आधारकार्डची गरज भासते. मात्र आता आधार कार्डच्या मदतीने फसवणुकीचे प्रकारही घडू लागले आहेत. अशीच एक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली असून, महिला डॉक्टरच्या आधार कार्डमध्ये छेडछाड करून 70 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हरयाणामधील रोहतकच्या सुभाष नगरमधील आहे, जिथे फसवणूक करणाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या आधार कार्डवरून 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले. महिलेने जेव्हा आयकर विवरणपत्र भरले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या आधार कार्डचा वापर करून बँकेत खाते उघडले आणि त्यानंतर बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून सुमारे 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या संपूर्ण प्रकरणाची महिलेला कल्पना नव्हती.

दरम्यान, अशी फसवणूक तुमच्यासोबतही होऊ शकते. ती टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.- तुमचे आधार कार्डसोबत ठेवा आणि कोणालाही देऊ नका.- बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तुमचा आधार क्रमांक कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.- UIDAI अॅपद्वारे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याचा पर्याय दिला जातो. तुम्हाला गरज नसताना आधार क्रमांक लॉक करा आणि आवश्यक असेल तेव्हा तो अनलॉक करा. त्यामुळे आधारचा गैरवापर टाळता येईल.- अनोळखी लोकांकडून फोन कॉल आल्यास ईमेल किंवा मेसेजमध्ये आधार क्रमांक, ओटीपी, वैयक्तिक किंवा बँक डिटेल्स देऊ नका.- डिजिटल आधार कार्ड मोबाईलमध्ये स्टोअर जेणेकरून आधार कार्ड हरवण्याचा धोका कमी होईल.- तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करा, जेणेकरून त्याच्याशी संबंधित मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAdhar Cardआधार कार्ड