शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे पुतण्याने जमिनीच्या कागदपत्रांत मित्रांशी संगनमत करुन केला फेरफार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:27 IST

चुलत्याने पुतण्यास विश्वासाने जागेची कागदपत्रे दिली असता त्याने त्याचा साथीदार मित्राशी संगनमत करून, परस्पर कागदपत्रात फेरबदल केला.

लोणी काळभोर : चुलत्याने पुतण्यास विश्वासाने जागेची कागदपत्रे दिली असता त्याने त्याचा साथीदार मित्राशी संगणमत करून, परस्पर कागदपत्रात फेरबदल केला. चुलत्याच्या जागी दुसराच इसम उभा करून स्वत:चे नावे बनावट बक्षीसपत्र तयार करून सदरची जमिन त्याचे नावे करून घेतली व फसवणूक केली म्हणून चुलत्याने पुतण्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.    याप्रकरणी वसंत शिवराम निंबरे ( वय ६४, रा. ताडीवाला रोड, कुमार गरीमा सोसायटी, पुणे ) यांनी दिलेल्या फियार्दी वरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राजेश शामराव निंबरे ( रा. येरावडा, पुणे ), भुपेंद्र अनिल जगताप व भरत बबन मोडक ( दोघे रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे ) या तिघांविरोधांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत निंबरे हे कुमार गरीमा सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तिन भाऊ मयत झाले आहेत. त्यांचे मोठ्या भावाचा मुलगा राजेश हा आपल्या आईसमवेत येरावडा येथे रहातो. वसंत निंबरे यांनी लग्न केले नसल्याने त्यांना कोणीही वारसदार नाही. ते काम करून पुतण्यास मदत करतात. सन १९८४ साली त्यांनी वडकी गावच्या हद्दीत गट क्रमांक १२३६ मध्ये ५ आर हे क्षेत्र बबन हरिबा मोडक यांचेकडून खरेदीखताने विकत घेतले आहे. तेव्हापासून सदर क्षेत्रावर त्यांचा ताबा आहे. सन २०१७ मध्ये त्यांना काम होत नसल्याने सदर क्षेत्र विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.              सन २०१७ मध्ये वसंत निंबरे यांनी पुतण्या राजेश यांस सदर जमिनीसाठी ग्राहक पाहण्यासाठी सांगितले व कागदपत्रे त्याचेकडे दिली. तोपर्यंत सदर जागेचा सातबारा त्यांचेच नावावर होता. मागील वर्षी २०१८ मध्ये त्यांना जमिनीसाठी ग्राहक मिळाले. त्यासाठी त्यांनी सातबारा काढला असता तो पुतण्या राजेश याचे नावावर निघाला. सदरबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांना हाकलून दिले. त्यानंतर त्यांनी सदर क्षेत्राची कागदपत्रे काढली असता त्यांना बक्षीसपत्राद्वारे सदर जागा राजेश याचे नावावर त्याचा मित्र भुपेंद्र जगताप याचे मदतीने झाली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी राजेश याला कधीही बक्षीसपत्र करून दिले नव्हते. तरीही बक्षीसपत्रात नमूद असलेली कागदपत्रे, खोटे पॅनकार्ड व स्वाक्षरी तसेच ते नसताना दुस-या इसमास त्यांचेजागी ऊभे करून खोटे बक्षीसपत्र तयार करून त्यांची फसवणूक करून जमिन स्वत:चे नावावर करून सदरची जमीन इतर व्यक्तींना विकत असल्याचे त्यांना समजले.           दोन महिन्यांनंतर वसंत निंबरे हे पुन्हा आपल्या जमिनीवर गेले असता त्यांना भरत बबन मोडक याने तेथे येवू दिले नाही. व येथे तुझी जागा नाही. येथे परत यायचे नाही. अशी दमदाटी करून तेथून हाकलून दिले. म्हणून त्यांनी तिघांविरोधांत फसवणुक केली म्हणून तक्रार दिली आहे. पुढील तपास ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस