शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केली फसवणूक; पोलिसांनी केली अटक 

By पूनम अपराज | Updated: December 29, 2020 20:24 IST

Crime News : मुंबई पोलिसांनी त्यांची टू सीटर स्पोर्ट्स गाडीही जप्त केली आहे.

ठळक मुद्देप्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रियाला मुंबई पोलिसांच्या सीआययूने अटक केली आहे.

मुंबईपोलिसांनी मोठं रॅकेट उद्ध्वस्त करत प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरियाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रियाला मुंबईपोलिसांच्या सीआययूने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दिलीप छाब्रिया याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची टू सीटर स्पोर्ट्स गाडीही जप्त केली आहे.

 

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही मोठी कारवाई केली. सीआययूचे प्रमुख, सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात दिलीप छाब्रियाला अटक केली आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

मुंबई पोलीस आयुक्तालयात दिलीप छाब्रियाची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार डिझायनर आणि कार मॉडिफिकेशन स्टुडिओ 'डीसी डिझाईन' चे संस्थापक दिलीप छाब्रिया याला अटक केल्याने उच्चभ्रू वर्गात खळबळ उडाली आहे. त्याच्यावर  मल्टीपल कार रजिस्ट्रेशनचे  रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. त्याच्याकडील सुमारे 75 लाख रुपयांच्या किंमतीची स्पोर्ट्स कार पोलिसांनी जप्त केली.

या  हाईएंड स्पोर्ट कारची नोंद इंद्रमल रमानीच्या नावावर आहे, जी तमिळनाडू प्रादेशिक परिवहन कार्यालयात इंद्रमल रमानीच्या नावावर नोंदली गेली आहे. मुंबई पोलिसांच्या सहआयुक्तांनी या प्रकरणाची खातरजमा केली आहे. ते आता या प्रकरणाची अधिक कसून चौकशी करतील.अटकेनंतर दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले असून, त्यांनी याप्रकरणी फसवणूक, खोटेपणा, विश्वासघात आणि फौजदारी कट रचल्याबद्दल एफआयआर दाखल केला असून याप्रकरणी लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. नोंदणीची कागदपत्रे बनावट होती आणि अशा प्रकारे बऱ्याच वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याचे एका रॅकेटचा शोध पोलीस घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तक्रारी करणार्‍यांमध्ये अभिनेतेही आहेतदिलीप छाब्रिया हे देशातील एक सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. त्याने अनेक सेलिब्रिटीज, विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्हॅनिटी व्हॅन डिझाइन केल्या आहेत. खरं तर, पाच तक्रारींपैकी एक अशी अभिनेत्री आहे ज्याने दिलीप छाब्रियावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रं बनवल्याचा आरोप केले आहेत.छाब्रिया यांची गुन्हे शाखा कसून चौकशी करणार आहे. 

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसcarकार