शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा परत करताय, असे का? तक्रारदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 09:06 IST

Mumbai : कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात उत्तर प्रादेशिक विभागाकडून मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात उत्तर प्रादेशिक विभागाकडून मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुरक्षारक्षक असलेले आणि कुरार पोलिसांच्या हद्दीत राहणारे केरकर तक्रारदार असलेली आई लक्ष्मी केरकर (६२) यांना घेऊन त्याठिकाणी आले होते. परिमंडळ १२ मधील मालमत्ता वाटप झाल्यानंतर कोणाला आपले मनोगत व्यक्त करायचे आहे का, असा सवाल सूत्रसंचालन करणारे पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी केला. 

कसले श्रेय घेताय?केरकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांची आई लक्ष्मी या काही कामानिमित्त १५ मिनिटांसाठी बाहेर गेल्या आणि तेवढ्या वेळात चोरांनी कपाट फोडत दागिने लंपास केले. माझी भावंडे आजारी पडली. वडील धक्क्याने गेले. नुकताच आईलादेखील हार्ट ॲटॅक येऊन गेला आहे. बऱ्याच खेपा टाकल्यानंतर मी पोलीस ठाण्यात जाणेच सोडून दिले. आरोपी स्थानिकच होते आणि त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीदेखील दिली होती. त्यानंतर आज जवळपास १२ वर्षांनंतर मला एक तोळे परत देऊन कसले श्रेय घेताय? अशी संतप्त प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली.

प्रकरणाचा अभ्यास करूकेरकर यांनी मंचावर जाऊन ‘माझे २००९ मध्ये १४ तोळे सोने चोरीला गेले होते. तुम्ही आज मला फक्त एक तोळे सोने परत करीत आहात, जर परत करायचेच आहे तर एक तोळेच का, असा सवाल त्यांनी थेट मंचावर उपस्थित असलेल्या नांगरे पाटील यांना विचारला. ज्यावर आम्ही तुमच्याशी नंतर बोलतो असे अपर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी त्यांना सांगितले. या विषयावर बोलताना केरकर यांचा एफआयआर मी वाचला आहे आणि आम्ही केरकरांच्या प्रकरणाचा अभ्यास करू’ असे आश्वासन नांगरे पाटील यांनी केरकर यांना देत त्यांची दखल घेतली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी