शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बँकेचे खाते हॅक करून साडेचौदा कोटी लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:11 IST

Crime News: नवीन मोंढा भागातील शंकर नागरी सहकारी बँकेत अनेक व्यापारी, अडते यांची खाती आहेत. या बँकेचे वजिराबाद भागातील आयडीबीआय या बँकेत खाते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय या बँकेत खाते आहे. आयडीबीआयमधील या खात्यातून हॅकर्सने एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही व्यक्तींच्या खात्यावर वळते करून बँकेला चुना लावला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी सहकारी बँकेने वजिराबाद पोलिसांना तक्रार देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

नवीन मोंढा भागातील शंकर नागरी सहकारी बँकेत अनेक व्यापारी, अडते यांची खाती आहेत. या बँकेचे वजिराबाद भागातील आयडीबीआय या बँकेत खाते आहे. या खात्यातून २ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ या एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही जणांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे वळविली आहे. शंकर नागरी सहकारी बँकेने २ जानेवारी रोजी आपले खाते तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात ही बाब आली. 

दरम्यान, या प्रकरणात तूर्त आयडीबीआय बँकेकडून मात्र कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून करण्यात येणार आहे.

खात्यातील रक्कम सुरक्षितn शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले खाते काही अज्ञात लोकांनी हॅक केले आहे. n ही जबाबदारी आयडीबीआय बँकेची आहे. तरी खातेदारांचे आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. n ग्राहकांनी काळजी करू नये, असे आवाहन बँकेचे चेअरमन माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम राजे यांनी केले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम