शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडूनच लाच घेणारा चार वर्षांसाठी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 05:41 IST

राज्य पोलीस मुख्यालयातील निलंबित कार्यालय अघीक्षक बळीराम शिंदे यास एका पोलीस शिपायाकडून लाच घेतल्याबद्दल शनिवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

मुंबई  - राज्य पोलीस मुख्यालयातील निलंबित कार्यालय अघीक्षक बळीराम शिंदे यास एका पोलीस शिपायाकडून लाच घेतल्याबद्दल शनिवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पोलिसांनी इतरांकडून लाच घेणे नवीन नाही. पण आपल्याच खात्यातील सहकाऱ्याचे कामही लाच न घेता करण्याची प्रवृत्ती दाखविणारे म्हणून हे प्रकरण विरळा होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या खटल्यात सर्व आरोपांत दोषी ठरवून विशेष न्यायालायचे न्यायाधीश आशुतोष भागवत यांनी आरोपी शिंदे यास चार वर्षांच्या कारावासाखेरीज १० हजार रुपये दंडही ठोठावला.या खटला चालविलेले अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर जे. व्ही. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष भोईटे या पोलीस शिपायाने घरासाठी कर्ज मिळावे यासाठी अर्ज केला होता. ते प्रकरण पोलीस महासंचालक कार्यालयात वर्षभर पडून होते. त्या कार्यालयात अधीक्षक असलेल्या शिंदे याने कर्ज मंजूर करून घेण्यासाठी भोईटे यांच्याकडे २२ हजार रुपयांची लाच मागितली. नंतर घासाघीस करून शिंदेने १० हजारांवर तडजोड केली.पोलिस शिपाई भोईटे यांनी शिंदे यांना लाच देण्याचा बहाणा करून याची खबर ‘एसीबी’ला दिली. त्यानुसार सापळा रचला गेला व २१ आॅक्टोबर २०१४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनवर भोईटे यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदे रंगेहाथ पकडला गेला. यातून उभ्या राहिलेल्या खटल्यात पोलीस खात्यामधीलच नऊ साक्षीदारांनी दिलेल्या साक्षींमुले शिंदे याच्यावरील आरोप निर्विवाद सिद्ध होऊन तो गजाआड गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी