शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:54 IST

सावनेर तालुक्यातील पटकाखेडी शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

ठळक मुद्देतिघी गंभीर जखमी : नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील पटकाखेडी येथील घटना

 लोकमत  न्यूज  नेटवर्क          नागपूर (सावनेर) : सावनेर तालुक्यातील पटकाखेडी शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. वर्षा मडावी (२६), रामप्यारी उदयसिंग ककोरीया (१८), अनसूया टेकाम (४५) आणि सुनिता कैलास (३५) सर्व रा.बरघाट, ता.शिवनी (मधप्रदेश) अशी मृत महिला कामागारांची नावे आहेत.तालुक्यातील पटकाखेडी आणि अदासा सीमेतील नाल्यावर सिंचन विभागाच्या वतीने बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या कामावर सकाळी १५ ते २० मजूर गेले होते. खड्ड्यात भिंत बनवित असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा तिथे उपस्थित महिला कामगारांच्या अंगावर कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तिघी गंभीर जखमी झाल्या.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लघु सिंचन विभागांतर्गत कंत्राटदार मंदीप चौधरी या बंधाऱ्याचे काम करीत आहे. या कामासाठी त्यांनी मध्य प्रदेशातून मजूर आणले आहेत. महाशिवरात्री असल्याने शुक्रवारी काम लवकर काम आटपून राहुटीकडे जाण्याचा कामगारांचा बेत होता. मात्र ही दुर्दैवी घटना घडली. इंदिरा धुर्वे, मधु आणि प्रियंका अशी जखमी महिला कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कंत्राटदारावर गुन्हा दाखलही घटना घटल्यानंतर कंत्राटदार चौधरी यांनी तीन मृत महिलांचे शवविच्छेदन होण्यापूर्वी त्यांचे मृतदेह परस्पर मध्य प्रदेशातील शिवनी येथे रवाना केले. यातील एक मृत महिला वर्षा मडावी हिचे सावनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी कंत्राटदार संदीप चौधरी रा.नागपूर आणि साईट इन्चार्ज जगदीश प्रसाद रा.अदासा यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ (अ), ३३७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू