शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार जणांना शस्त्रांसह अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: March 19, 2023 20:23 IST

लातुरातील घटना, पाच जणांविराेधात गुन्हा दाखल

राजकुमार जाेंधळे, लातूर: दराेडा टाकण्याच्या तयारीतील चाैघांना पाेलिसांनी शस्त्रासह अटक केली असून, त्यांच्या विराेधात रविवारी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सांगितले, विवेकानंद चौक पाेलिस ठाण्याच्या पाेलिसांची रविवारी पहाटे गस्त सुरू हाेती. दरम्यान, सपोनि. रामचंद्र केदार यांना माहिती मिळाली. लातुरातील एका अपार्टमेंटलगतच्या शेतात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही सराईत गुन्हेगार लपून बसले आहेत. याच्या आधारे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने दराेडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्यांना चारही बाजूने वेढा घातला. त्यांना माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले. एक जण अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

ईश्वर गजेंद्र कांबळे (वय २१), प्रफुल श्रीमंत गायकवाड (वय २७), महादेव अशोक पाटोळे (वय २२), राहुल महादेव कसबे (वय २२) यांना ताब्यात घेतले असून, महबूब ऊर्फ गोपाळ करीम शेख (वय २८, सर्व रा. लातूर) हा पळून गेला आहे. ताब्यातील चाैघांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडे बतई, कोयता, चाॅपर, कत्ती असे साहित्य आढळून आले. चाैकशी केली असता दरोडा टाकण्यासाठीच अंधारात लपल्याची कबुली त्यांनी दिली. अटक करण्यात आलेले आराेपी हे पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत विवेकानंद चौक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि बालाजी गोणारकर करत आहेत. ही कारवाई सपोनि. रामचंद्र केदार, उदय सावंत, पोउपनि हाजी सय्यद, संजय कांबळे, मुनवरखा पठाण, दयानंद सारोळे, सुधीर साळुंखे, संजय बेरळीकर, विनोद चलवाड, नारायण शिंदे, रमेश नामदास, मिलिंद कांबळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूर