शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकपच्या सट्टेबाजीत पोलिसासह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 06:34 IST

आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड या वर्ल्डकप सामन्यावर दादरमध्ये सुरू असलेल्या सट्टेबाजीच्या अड्ड्यावर माटुंगा पोलिसांनी मंगळवारी छापा मारला.

मुंबई - आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड या वर्ल्डकप सामन्यावर दादरमध्ये सुरू असलेल्या सट्टेबाजीच्या अड्ड्यावर माटुंगा पोलिसांनी मंगळवारी छापा मारला. यात, बुकींसह पोलीस उपनिरीक्षकालाही पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर खरमाटे (३४) असे पोलिसाचे नाव असून तो भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानक पूर्वेकडील रामी गेस्ट लाईन हॉटेलमध्ये मिकीन शहा (३३) नावाचा बुकी वर्ल्डकपच्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक भरत भोईटे यांना मिळाली.त्यानुसार मंगळवारी तपास पथकाने रात्री या हॉटेलवर छापा टाकला. वर्ल्डकप सिरीजमधील आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्यावर लोटसबुक डॉट कॉम या वेबसाईटद्वारे ही मंडळी सट्टा लावत असल्याचे दिसून आले. त्यानुसार बुकी शहासह साथीदार मनीष सिंग, प्रकाश बनकर यांना ताब्यात घेण्यात आले. खरमाटेही तेथे १ लाख ९३ हजार रुपये आणि ६ मोबाईलसह सापडला. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी खरमाटे याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सिंगे यांनी दिली.यापूर्वी माटुंगामध्ये डिटेक्शन अधिकारीभायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत खरमाटे हा डिटेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होता. यापूर्वी तो माटुंगा पोलीस ठाण्यातही डिटेक्शन अधिकारी होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी