शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाची क्रूरता, लहान चिमुकल्यांसह ५ जणांची हत्या; मध्यरात्री घडला थरार, पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:45 IST

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राय सिंह यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या सूनेला भाडेकरु कृष्णा तिवारीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं

ठळक मुद्दे मुलाला दुसरीकडे पाठवण्याचा कट हा षडयंत्राचाच भाग होता का? यावर पोलीस तपास करत आहेत.रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपीनं खुरपं आणि गवत कापायचा चाकू स्वत: जवळ ठेवला.सूनेला मारल्यानंतर आरोपी मध्यरात्री २.२० च्या सुमारास सिडी चढून भाडेकरू कृष्णा तिवारीच्या घरी पोहचला.

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जी ऐकून तुमचंही ह्दय पिळवटून जाईल. याठिकाणी निवृत्त सैनिकाने अर्ध्या तासात ५ जणांची हत्या केली आहे. इतकचं नाही तर आरोपीनं लहान मुलांनाही सोडलं नाही. मुलांची देखभाल करणारं कुणी वाचलं नाही म्हणून चिमुकल्यांनाही मारून टाकलं असं त्यानं चौकशीत सांगितले. सध्या गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

जानेवारीपासून षडयंत्र रचलं

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राय सिंह यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या सूनेला भाडेकरु कृष्णा तिवारीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर त्याच्या मनात हा राग कायम राहिला. या दोघांमधील अनैतिक संबध यापुढेही सुरुच राहिले. घटनेच्या एक दिवस आधी आरोपीनं त्याच्या मुलाला खाटू श्यामजवळ पाठवलं होतं. मुलाला दुसरीकडे पाठवण्याचा कट हा षडयंत्राचाच भाग होता का? यावर पोलीस तपास करत आहेत.

अर्ध्या तासात ५ हत्या

रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपीनं खुरपं आणि गवत कापायचा चाकू स्वत: जवळ ठेवला. घराच्या लाईट बंद केल्या. मध्यरात्री २ वाजता आरोपी सूनेच्या रुममध्ये पोहचला आणि दरवाजा ठोठावू लागला. दरवाजा उघडताच आरोपी राय सिंह त्याच्या सूनेच्या अंगावर गेला आणि अंगावर चाकूने सपासप वार केले. जोपर्यंत सूनेचा मृत्यू होत नाही तोवर आरोपीनं तिच्या शरीरावर वार सुरूच ठेवले.

सूनेला मारल्यानंतर आरोपी मध्यरात्री २.२० च्या सुमारास सिडी चढून भाडेकरू कृष्णा तिवारीच्या घरी पोहचला. कृष्णाने दरवाजा उघडला तेव्हा त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. १० मिनिटांनी २.३० वाजता आरोपी कृष्णाची पत्नी अनामिका हिच्या रुममध्ये शिरला आणि चाकूने तिचीही हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपीनं शेजारीच असलेल्या दोन्ही मुलांनाही क्रूरतेने मारून टाकलं. सून आणि भाडेकरूमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीनं संतापाच्या भरात दोघांना मारलं. पण त्यांच्यासोबतच भाडेकरूची पत्नी अनामिका आणि तिच्या दोन मुलांनाही ठार केले. पोलीस चौकशीत लहान मुलांना का मारलं असं विचारला असता, त्यांचा सांभाळ कोण करणार म्हणून त्यांना मारुन टाकल्याचं आरोपीनं सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस