शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत एकाच दिवसात घरफोडीच्या चार घटना; वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश

By नितीन पंडित | Updated: August 29, 2022 16:36 IST

भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी व चोरीच्या एकाच दिवसात चार घटना घडल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

भिवंडी :

दि.२९- भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी व चोरीच्या एकाच दिवसात चार घटना घडल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.पहिल्या घटनेत भांडी दुकानदार मितेश केसरीमल जैन यांचे प्रभुआळी येथील लक्ष्मी मोहन स्मृति सदन या इमारतीमध्ये भांड्याचे गोदाम आहे.त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गोदामाच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून गोदामात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे घंटी, हंडा कळशी,समई, परात अशा पितळेच्या भांड्यांची चोरी केली आहे.याप्रकरणी मितेश जैन यांनी रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.कारीवली गावाच्या हद्दीतील वसंतनगर येथील चाळीत निखील परशुराम नाईक यांचे चायनीज फुडपॉईंट सेंटर नावाचे दुकान आहे . शनिवारी मध्यरात्री चायनिज सेंटर बंद करून घरी गेले असता रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील टेलिव्हिजन व रोख रक्कम असा २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे .याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहनाळ ययेथील मुनीसुरत कंपाऊंड येथील एका इमारती मध्ये असलेल्या धनलक्ष्मी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या वाहतूक कंपनीच्या गोदामात ठेवलेले १ लाख २० हजार ६९१ रुपये किमतीच्या ६ अल्युमिनियम प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्या आहेत .या प्रकरणी धनलक्ष्मी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे प्रभाकर मिश्रा यांनी नारपोली पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली आहे.चौथी घटना शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे .पिरणीपाडा गैबीपीर रोड येथील इमारती मध्ये राहणारे शशिकुमार कृष्णा तईल यांचे घर बंद असताना त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम चोरी केली आहे.शहरात पोलीस बंदोबस्त,गस्त,नाकाबंदी अशा विविध उपाययोजना करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करीत असतानाही घरफोडी व चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी