शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 15:32 IST

सदर प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई: विक्रोळी टागोरनगरमधील मुंबई महापालिकेच्या शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. टागोरनगरमधील पालिकेच्या मुंबई पब्लिक हायस्कूल या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरीत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनीचां लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांनी या शिक्षकाला विक्रोळी पोलीस ठाण्यात नेले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

सदर प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घटलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. विक्रोळीच्या पालिका शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. 

चित्रा वाघ यांनी पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, सदर शिक्षकावर कार्यवाही होणारच, परंतु या शिक्षकाची कुठलीही माहिती न घेता नियुक्ती करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांवर देखील तपासात जर तसं निष्पन्न झालं तर कार्यवाही केली जाईल. यासोबतच भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत, यासाठी पालिका प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

शिक्षा देण्याच्या नावाखाली हा पीटी शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. लैंगिक छळाचा आरोप असलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी असे कृत्य करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या शिक्षकाने ठाण्यातही असा अत्याचार केल्याची कबुली देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबईPoliceपोलिसChitra Waghचित्रा वाघ