शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:27 IST

तपासात तीन मुलींनी गुन्हा कबुल केला तर चौथी मुलगी उडवाउडवीची उत्तरे देत होती.

फिनिक्स - एरिजोना इथं पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या ४ मुलींवर एका मुलाला मारून त्याच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप लागला आहे. ही घटना एरिजोनाच्या सरप्राइज येथे घडली आहे. मुलींनी शाळेच्या बाथरूममध्ये मुलाला चाकू मारण्याचे षडयंत्र रचले होते. या आरोपी मुलींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर धमकी देणे आणि खूनाचा प्रयत्न असा आरोप आहे. ब्रेकअपमुळे मुलींनी हे कृत्य केल्याचे बोलले जाते. 

फिनिक्स उपनगर सरप्राइजमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मुलींनी त्यांच्या सहकारी मुलाला शाळेच्या बाथरूममध्ये बोलावून त्याच्या पोटात चाकू भोसकण्याचा कट रचला होता. या मुलींनी लंच आणि रिसेस काळात हा प्लॅन बनवला होता. ही घटना लेगेसी ट्रेडिशनल शाळेत मागील ऑक्टोबरमध्ये घडली. जेव्हा शाळेतील इतर मुलींनी या मुलींना षडयंत्र रचताना ऐकले तेव्हा त्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली असं पोलीस रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. 

चौघा मुलींनी रचला कट

एका मुलीला शाळेत चाकू आणायचा होता. दुसरी मुलगी त्या चाकूने मुलावर हल्ला करणार होती. तिसरी मुलगी हल्ला करताना इतरांवर देखरेख ठेवणार होती तर चौथ्या मुलीने एक सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामुळे या मुलाने आत्महत्या केली असावी असं पोलिसांना वाटेल. हे सर्व चौघींनी मिळून ठरवले होते. त्यात मुलगा आणि मुलीच्या ब्रेकअपवरून हे घडल्याचे सांगितले जाते. तपासात तीन मुलींनी गुन्हा कबुल केला तर चौथी मुलगी उडवाउडवीची उत्तरे देत होती. १०-११ वर्षाच्या मुलींना धमकी देणे आणि हत्येचा कट रचणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, मुलींची चौकशी केली तेव्हा तीन मुलींनी त्यांची चूक कबूल केली परंतु चौथी मुलगी हसत होती आणि बहाणे बनवू लागली. डॉक्टरांच्या मते या मुलींचे वय कमी आहे. त्यामुळे त्यांना या गोष्टीचे गांभीर्य समजू शकत नाही. शाळेतून या मुलींना काढून टाकण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी