शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

औषधी रसायने चोरणारी चौकडी भिवंडीत गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 03:53 IST

औषधी रसायनांची चोरी करणाऱ्या चौकडीला बेड्या ठोकण्यात नारपोली पोलिसांना मंगळवारी यश आले आहे

भिवंडी : औषधी रसायनांची चोरी करणाऱ्या चौकडीला बेड्या ठोकण्यात नारपोली पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. या चोरट्यांकडून तब्बल २९ लाख ३५ हजार २५० रु पयांचा दोन ठिकाणाहून चोरलेला मुद्देमाल जप्त केला.काल्हेर येथील ओम लॉजिस्टिक प्रा.लि. या ट्रान्सपोर्टच्या गोदामातून २२ ते २६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विशाखापट्टणम येथील वसुधा फार्मा केमिकल प्रा.लि. कंपनीने अंजूरफाटा येथील शुभम फार्मा केमिकल प्रा.लि. या मुनिसुव्रत कम्पाउंड राहनाळ येथील कंपनीला पोहोचवण्यासाठी दिलेल्या लोसारटन पोटॅशियम अ‍ॅण्ड सायप्रोहेपटेडीन हायड्रोक्लोराइड या औषधी रसायनाची वाहतुकीदरम्यान पाच लाख ६० हजार ५०० रु पयांच्या मालाची चोरी झाली होती. या गुन्ह्याची नोंद झालेली असतानाच पुन्हा त्याच गोदामात बनावट चावीच्या साहाय्याने २० ते २३ जुलैदरम्यान याच रसायनांचे १६ सीलबंद ड्रम लंपास करून तब्बल २७ लाख ३७ हजार ६०० रु पयांची चोरी केली गेली. गोदाम व्यवस्थापक शैलेंद्रकुमार सिंग यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली.विशाखापट्टणम ते भिवंडी यादरम्यान तब्बल सात ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या वाहनांतून मेडिसीन पावडर भिवंडीत आणली होती. यामध्ये तब्बल १० वाहनचालकांवर मालाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बुºहाडे यांनी तपास करून स्वप्नील पाटील (रा. केवणी दिवे), संतोष म्हात्रे (रा. कशेळी), ओम लॉजिस्टिक प्रा.लि.मधील कामगार लोकेश सैनी (रा. काल्हेर), हरी यादव (रा. ठाणे) या चौघांना ताब्यात घेतले.या चौघांनी मेडिसीन पावडरचे ड्रम चोरल्याची कबुली दिली. यातील स्वप्नील ठाकºया पाटील हा टेम्पोचालक असून तो मालाची वाहतूक करण्यासाठी ओम लॉजिस्टिक लिमिटेड या ट्रान्सपोर्ट कंपनीत भाडेतत्त्वावर टेम्पो चालवत होता. व्यवस्थापकाची नजर चुकवून त्याने गोदामांची बनावट चावी तयार केली. या दोन्ही गुन्ह्णांतील चोरीला गेलेल्या एकूण ३२ लाख ९८ हजार १०० रु पयांच्या मालापैकी २९ लाख ३५ हजार २५० रुपयांची मेडिसीन पावडर जप्त करण्यात आली आहे.अशी करायचे चोरीकामगार लोकेश सैनी हा गोदामात आलेल्या मेडिसीन पावडरच्या मालाची व किमतीची माहिती आपल्या तिघा साथीदारांना देत असे. त्यानंतर, शनिवारी रात्री स्वप्नील पाटील व संतोष म्हात्रे हे दोघे बनावट चावीने गोदाम उघडून तेथील रासायनिक पावडर असलेल्या ड्रमचे सील तोडून त्यामधील महागडी पावडर आपल्याजवळील गोणीत भरून ड्रममध्ये साधी पावडर भरून तो ड्रम सीलबंद करून ठेवत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी