शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालकास लुटणाऱ्या चौकडीला अटक तर एक आरोपी फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 19:13 IST

Narpoli police arrested four robbers :  नारपोली पोलीसांची कारवाई

ठळक मुद्देजयेश संतोष पाटील ( वय २२ वर्ष , रा.  अंजुर ) जय मनोहर पाटील ( रा. अलीमघर ) अजय पाटील ( रा.भरोडीगाव ) हरिश पाटील ( रा. भरोडी गाव ) अशी वाहन चालकास मारहाण व लुटमार केल्याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

भिवंडी - ठाण्यावरून नाशिककडे जाणाऱ्या वाहन चालकास पाच जणांच्या टोळीने अडवून त्यास रोडने मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावरील हायवे दिवा पेट्रोल पंपासमोर २९ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी वाहन चालक अमोल सुरेश एडके ( वय २७ रा. पुणे ) याने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नारपोली पोलोसांनी आरोपींचा कसून शोध घेतला असता या मारहाण व लुटमार प्रकरणी अंजुर, आलीमघर, व भरोडी येथून चार जणांना शुक्रवारी अटक केली आहे तर त्यांचा एक साथीदार अजूनही फरार आहे. 

            

जयेश संतोष पाटील ( वय २२ वर्ष , रा.  अंजुर ) जय मनोहर पाटील ( रा. अलीमघर ) अजय पाटील ( रा.भरोडीगाव ) हरिश पाटील ( रा. भरोडी गाव ) अशी वाहन चालकास मारहाण व लुटमार केल्याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. नारपोली पोलिसांनी या चौघांनाही मोठ्या शिताफीतीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तपासात त्यांच्याकडू दरोडयातील मालमत्ताही हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलोसांनी दिली आहे. सदर तपास भिवंडी पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण, सहा.पोलीस आयुक्त प्रशांत ढोले,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे रविंद्र वाणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. जे. व्हरकाटे, पोलीस हवालदार सातपुते, पोलीस हवालदार नवले, पोलीस नाईक नाईक, सोनगिरे, पोलीस शिपाई जाधव,  बंडगर, माने, पोलीस शिपाइ शिरसाट यांनी केली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरीMobileमोबाइल