शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:33 IST

कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे.

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली आहे. या प्रकरणातील अन्य एक आराेपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

संदीप हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. वाटेत शंभरफुटी चौक येथे  एका दारूच्या दुकानातून बीअर घेण्यासाठी संदीप आणि प्रेम थांबले होते. ते परत निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चॉपरने हल्ला केला. हल्ला करून ते पसार झाले. 

आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ ऊर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील ऊर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याप्रकरणी संदीपने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता.  संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीपला गाठले. त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याची हत्या केली. आरोपींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.