शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 11:06 IST

Fraud with VK Singh Daughter : याप्रकरणी योजना सिंह यांनी बुधवारी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.

Fraud with VK Singh Daughter : गाझियाबाद : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि गाझियाबादचे माजी खासदार सेवानिवृत्त जनरल व्हीके सिंह यांची मुलगी योजना सिंह यांनी व्यावसायिक आनंद प्रकाश यांच्याविरोधात जवळपास साडेतीन कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

२०१४ मध्ये राजनगर सेक्टर-२ मधील एका घराचा व्यवहार व्यावसायिकासोबत ५.५ कोटी रुपयांना केला होता. त्यावेळी साडेतीन कोटी रुपये घेऊनही व्यावसायिकाने विक्रीपत्र तयार केले नाही, असा आरोप योजना सिंह यांनी केला आहे. याप्रकरणी योजना सिंह यांनी बुधवारी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.

व्हीके सिंह यांची मुलगी योजना सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जून २०१४ मध्ये राजनगरमधील घराचा व्यवहार केल्यानंतर व्यावसायिक आनंद प्रकाश यांना जवळपास ३.५  कोटी रुपये दिले. त्यानंतरही व्यावसायिक आनंद प्रकाश यांनी विक्रीपत्र केले नाही.

बनावट पावती बनवल्याचा आरोपऑगस्टमध्ये आनंद प्रकाश यांच्या वतीने चुकीच्या तथ्यांच्या आधारे नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यावर त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत उत्तर पाठवले होते. त्यांना दिलेल्या पैशांचा अपहार करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप योजना सिंह यांनी केला आहे. बनावट पावती बनवून एडीएम कोर्टात निष्कासनाचा खटला दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. डीसीपी सिटी राजेश कुमार यांनी सांगितले की, कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजनगर येथील घराच्या व्यवहाराबाबत खटला सुरू आहे. लवकरच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

राजनगरमधील घर व्यवहार प्रकरणघरावर कर्जही काढण्यात आल्याचे त्यांच्या माहितीतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी व्हीके सिंह यांनी चुकीच्या तथ्यांवर आधारित बातम्या चालवल्याबद्दल आनंद प्रकाश आणि एका मीडिया व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. तसेच, व्हीके सिंह यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी यूट्यूब-आधारित न्यूज पोर्टलच्या मालकाला अटक केली होती. व्हीके सिंह यांनी तक्रारीत यूट्यूबवर प्रसिद्ध केलेली माहिती निराधार आणि तथ्य नसलेली असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशVK Singhव्ही के सिंग