शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
5
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
6
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
7
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
8
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
9
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
10
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
11
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
12
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:14 IST

Independence Day 2019: राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसध्या ते कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबई - १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ४६ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली. त पाच जणांना विशेष सेवेसाठी आणि ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त पाटील यांचा समावेश झाला आहे. त्यांचे पोलीस प्रशासनाकडून अभिनंदन होत आहे. आर. आर. पाटील यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता यापूर्वी २००६ मध्ये राष्ट्रपतींचे पोलीस पदक तसेच पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. पाटील यांनी शांतीनिकेतन महाविद्यालय सांगली येवून शास्त्र शाखेची पदवी घेतली. त्यानंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन १९८७ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. आतापर्यंत मुंबई, कोडोली, जयसिंगपुर, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्या ३२ वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये त्यांना ६४२ बक्षीसे मिळाली आहेत.महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे सहाय्यक कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात येणार्‍या उत्कृष्ट गुन्ह्यांच्या तपास पदकांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. देशातील विविध तपास यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या 96 जणांना हे विशेष पदक देण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील दोन महिला अधिकार्‍यांसह 11 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र  पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपअधिक्षक प्रकाश अमृतकर यांच्यासह मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुषाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर आणि सुधाकर देशमुख तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन माने यांच्यासह महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि प्रियांका शेळके यांना देखील विशेष पदक जाहीर करण्यात आले आहेत. तसेच अन्य राज्यांसह राज्य व केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनkolhapurकोल्हापूरCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण