शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, महिलेविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 07:40 IST

या महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या आरोपावरून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मुंबई : घाटकोपरमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकल खाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रात्री फोन आल्यानंतर ते घराबाहेर पडले होते. मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून नीलिमा चव्हाण नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या आरोपावरून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते. त्यांनी, विधानसभा निवडणूकही लढवली होती. गुरुवारी रात्री फोन आल्यानंतर ते घराबाहेर पडले. गाडी आणि सुरक्षा रक्षक यांनाही घरीच थांबवून, कामानिमित्त जात असल्याचे सांगून रिक्षाने घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. रात्री  अकराच्या सुमारास ट्रॅकवर झोपले. त्याचदरम्यान, कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलखाली येत त्यांचा मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला. 

महिलेकडून ब्लॅकमेलिंगचा आरोप नीलिमा चव्हाण नावाची महिला त्यांच्या ओळखीची असून ती अनेकदा वडिलांना कॉल करून ब्लॅकमेल करत असल्याचा संशय मोरे यांच्या मुलाने पोलिसांकडे वर्तवला आहे. अनेकदा तिच्यासोबत कॉलवर बोलताना वडिलांना पाहिल्याचेही पोलिसांना सांगितले आहे. मुलाच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी