शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’ शहराध्यक्षाच्या खुनाचा कट : भिवंडीच्या माजी उपमहापौरांस हत्या प्रकरणात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 01:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या हत्येच्या कटात कथित सहभाग असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन मंगरू हुसेन सिद्दीकी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने शहर पोलिसांनी त्यांना बुधवारी राहत्या घरातून अटक केली.

भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या हत्येच्या कटात कथित सहभाग असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन मंगरू हुसेन सिद्दीकी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने शहर पोलिसांनी त्यांना बुधवारी राहत्या घरातून अटक केली. सिद्दीकी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आहे.शहरातील समदनगर भागात २० जूनच्या रात्री दोन संशयित फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मो. साजीद निसार अन्सारी व मो. दानिश मो. फारूक अन्सारी या दोन शार्पशूटर्सना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीची दोन महागडी पिस्तुले व १५ जिवंत काडतुसे सापडली होती. पोलिसांनी त्यांची कसून तपासणी केली असता २८ जून २०१८ रोजी मो. अलीम निजामुद्दीन सिद्दीकी ऊर्फ अलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांना मारण्यासाठी दोन लाख रु पयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी अलीम बक्कन सरदार यास व माजी महापौर अहमद हुसेन यांचा भाऊ मो. अश्फाक मंगरू सिद्दीकी या दोघांना अटक केली होती. पुढील तपासात या कटात काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक अहमद सिद्दीकी हेही सहभागी असल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. अहमद सिद्दीकी हे तेव्हापासून फरार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खालिद गुड्डू यांनी भिवंडीतील पोलीस आरोपीला अटक करण्यात हयगय करत असल्याचा आरोप करत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तक्र ार केली होती.अखेर, शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी अहमद सिद्दीकी यास अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हत्येच्या कटातील गांभीर्य लक्षात घेऊन २० आॅगस्टपर्यंत सिद्दीकी यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.कार्यकर्त्यांची गर्दीयावेळी न्यायालयात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी