शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने पोटात लपविले ५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 06:45 IST

व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या एका महिलेने आपल्या पोटात ८०० ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई : व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या एका महिलेने आपल्या पोटात ८०० ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)ने तिला मुंबई विमानतळावरून अटक केली असून, या कोकेनची किंमत तब्बल पाच कोटी आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालयाचे सहआयुक्त समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.बाल्झाबाप्तिसा करेंद्रालेन्नी (२७) असे या महिलेचे नाव आहे. ती इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाने सौ पाऊलो (ब्राझिल) येथून आदिस अबाबामार्गे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली होती. तिने कॅप्सूलमध्ये लपवून कोकेन गिळले होते.न्यायालयाने सीमाशुल्क कायदा १९६२च्या कलम १०३ अन्वये तिच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यास परवानगी दिली. जे. जे. रुग्णालयात तिच्या चाचण्या करण्यात आल्या. तिने कॅप्सूल गिळल्याचे पोटाच्या एक्सरे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. डॉक्टरांनी याबाबत माहिती दिल्यानंतर, आरोपीने कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. आरोपी महिलेला केवळ स्पॅनिश भाषा बोलता येत असल्याने गौतम पांडे या स्पॅनिश भाषा जाणकाराच्या मदतीने तिच्याशी संवाद साधून तिचा जबाब नोंदविण्यात आला.वैद्यकीय चाचणीनंतर तिच्या पोटातून कॅप्सूल बाहेर काढण्यात यश आले. कॅप्सूलची तपासणी केल्यानंतर त्यात कोकेन लपवून आणल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, तिच्याकडून ७९६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत ४ कोटी ७७ लाख इतकी आहे. न्यायालयाने तिला २८ आॅगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.आरोपी महिलेची पार्श्वभूमीआरोपी महिला सुरुवातीला टेलिकॉलर म्हणून कार्यरत होती. नंतर काही काळ ती वेश्या व्यवसायात होती. त्यानंतर, तिने दोन वर्षे लष्करात काम केले. तिच्या मित्राने तिला या कामाबाबत माहिती दिली. तिचा नायझेरियन मित्र जगातील अनेक देशांमध्ये अमली पदार्थ पाठवत असल्याची माहिती तिने दिली. १०० कॅप्सूल मुंबईत नेण्यासाठी तिला ५ हजार अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार होते. मात्र, तिला केवळ ८० कॅप्सूल गिळता आले. केवळ पैशांच्या हव्यासापोटी हा गुन्हा केल्याची कबुली तिने दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ