शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून विदेशी चलने जप्त; कस्टम विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:11 IST

एअर इंडिया ‘एआय ९९३’ च्या विमानात एक प्रवाशी बेकायदेशीररित्या विदेशी चलने घेऊन दुबईला जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाला मिळताच हे विमानत दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानात तपासणी करून त्या प्रवाशाकडून विदेशी चलने हस्तगत केली.

ठळक मुद्देकस्टम विभागाने बेकायदेशीररित्या नेत असलेली १९ लाख रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केलीह्या विदेशी चलनात युरो, दीरामंस व इतर विदेशी चलनांचा समावेश

वास्को - बंगळूरहुन गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर येथून दुबईला जाणार असलेल्या ‘एअर इंडिया’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाने बेकायदेशीररित्या नेत असलेली १९ लाख रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली. बंगळूरहुन गोव्यात आलेल्या एअर इंडिया ‘एआय ९९३’ च्या विमानात एक प्रवाशी बेकायदेशीररित्या विदेशी चलने घेऊन दुबईला जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाला मिळताच हे विमानत दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानात तपासणी करून त्या प्रवाशाकडून विदेशी चलने हस्तगत केली.दाबोळी विमानतळावरील गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या (१ जानेवारी) पहिल्याच दिवशी सदर कारवाई करण्यात आली. बंगळूरहुन गोव्याला आलेल्या विमानात एक प्रवाशी विदेशी चलने घेऊन असल्याची माहिती मिळताच गोवा कस्टम विभागाचे उपकमिश्नर डॉ. राघवेंद्र पी व इतर अधिकाऱ्यांनी विमानात जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली. ह्या तपासणीच्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना एका पुरूष प्रवाशावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आला. यावेळी त्याची कसून तपासणी केली असता त्यांने अंतर वस्त्राच्या आत विविध विदेशी चलने लपवल्याचे उघढ झाले. कस्टम अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात पुढे तपासणी केली असता हा प्रवाशी सदर विदेशी चलने बेकायदेशीररित्या दुबईला नेत असल्याचे उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या ह्या विदेशी चलनात युरो, दीरामंस व इतर विदेशी चलनांचा समावेश असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन भारतीय बाजारात यांची एकूण रक्कम १९ लाख रुपये असल्याचे सांगितले.बंगळूर येथे चढलेला हा प्रवाशी बेकायदेशीररित्या कशासाठी विदेशी चलने नेत होता याबाबत कस्टम अधिकारी सध्या तपास करीत आहेत. गोवा कस्टम विभागाचे कमिश्नर आर.मनोहर व अतिरिक्त कमिश्नर टी.आर.गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.एप्रिल २०१८ ते आतापर्यंत कस्टम विभागाने केली ५५ लाख रुपयांची विदेशी चलने जप्तआर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अर्थात एप्रिल २०१८ ते आतापर्यंत कस्टम विभागाने केलेल्या विविध कारवाईत एकूण ५५ लाख रुपयांची विदेशी चलने जप्त केली असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदेशीररित्या दाबोळी विमानतळावरून चलने नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मागच्या काळात कस्टम अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ह्या कारवाया करून ह्या आर्थिक वर्षात अजूनपर्यंत ५५ लाख रुपयांची विदेशी चलने जप्त केली आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाArrestअटक