शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी नागरिकांची फसवणूक करणारे विदेशी नागरिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 05:05 IST

क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जोहरी अकबर (३०) आणि हमीद अली फिरोज (२१) असे या इराणी नागरिक आरोपींची नावे आहेत.

मुंबई  - क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जोहरी अकबर (३०) आणि हमीद अली फिरोज (२१) असे या इराणी नागरिक आरोपींची नावे आहेत़ फसवणुकीतून वसूल केलेली रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. विक्रोळी पोलिसांनी ही कारवाई केली.अली इंद्रिस नासिर (५३) हे यमनचे नागरिक असून ते तेथील एक आर्मी अधिकारी आहेत. ते नेहमी आपल्या पत्नीसोबत मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी येतात. दोन ते तीन महिन्यांनी ते औषधोपचार करून यमनला परत जात असत. त्यासाठी त्यांनी महंमद अली रोड येथे भाड्याने घर घेतले आहे. नेहमीप्रमाणे ते दोघेही १९ जानेवारीला फोर्टिस रुग्णालयातून तपासणी करून साधारणत: दुपारी दीडच्या सुमारास घरी टॅक्सीने परतत होते. ऐरोली ब्रिजखालून पूर्व द्रुतगती मार्गावरील भांडुप पम्पिंग बस स्टॉपजवळ आल्यानंतर एका काळ्या रंगाच्या कारमधून दोन अज्ञात इसमांनी टॅक्सी चालकाला टॅक्सी बाजूला थांबविण्यासाठी सांगितले. त्यानुसार टॅक्सी थांबविल्यानंतर कारमधून दोन इसम उतरले. त्यामधील एका इसमाने क्राइम ब्रांचचे ओळखपत्र दाखविले. आम्ही क्राइम ब्रांचचे अधिकारी असून, तुमच्याकडे अमली पदार्थ असल्याचे सांगून त्यांची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या बॅगेतून चार हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत २ लाख ८४ हजार रुपये) काढून घेऊन तेथून पोबारा केला.या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अली यांनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली. त्यानुसार विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन पथके नेमली. सीसीटीव्ही फूटेज आणि माहितीच्या आधारे आरोपी अंधेरी येथील हॉटेलमध्ये दडून बसल्याचे कळले.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही इराणी नागरिकांना हॉटेलमधून अटक केली. त्यांच्याकडून पासपोर्ट आणि ६४ हजार ३३४ रुपयांची भारतीय तसेच अमेरिकन आणि विदेशी चलनाची रक्कम हस्तगत करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई