शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसोबत जबरदस्तीनं शारिरीक संबंध बनवणे बलात्कार होत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:32 IST

Chhattisgarh High Court: छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन के चंद्रवंशी यांनी हा निर्णय दिला आहे.

बिलासपूर: पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक कृत्य करणं म्हणजे बलात्कार होत नाही, असा निर्वाळा छत्तीसगडउच्च न्यायालयानं दिला आहे. फक्त, पत्नीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं, असं न्यायालयानं म्हटलंय. तसेच, या प्रकरणी पत्नीनं लावलेल्या बलात्काराच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या 37 वर्षीय पतीवर तिच्याशी इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. तसेच, पती आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला होता. 

आपल्या तक्रारीत पत्नीनं म्हटलं की, 2017 मध्ये त्यांच लग्न झालं होतं. लग्नानंतर पतीनं इच्छेविरुद्ध अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात, बेमेटाराच्या सत्र न्यायालयानं पतीविरोधात कलम 498, 376, 377 आणि 34 अंतर्गत आरोप निश्चित केले होते. याविरोधात पतीनं उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

कोर्टानं काय म्हटलंआयपीसीच्या कलम 375 च्या अपवाद II वर अवलंबून न्यायमूर्ती एन.के.चंद्रवंशी यांनी या प्रकरणात कायदेशीररित्या दांपत्य विवाहित असल्यास, जबरदस्तीनं किंवा पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीकडून संभोग किंवा कोणतंही लैंगिक कृत्य बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही, असा निर्वाळा दिला. परंतु, पत्नीच्या इतर आरोपांची चौकशी केली जाणार आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडHigh Courtउच्च न्यायालय