शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकात लग्न करायला भाग पाडले, काही वर्षांतच तरुणीने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 00:47 IST

गुन्हा दाखल : आत्महत्येबाबत भावासह पतीला व्हॉट्सअ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकाच ठिकाणी राहत असताना ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमातूनच बंधने वाढली. जीन्स घालण्यावरून वाद सुरू झाला. पुढे प्रेयसीने सोबत राहण्यास नकार देताच चाकूच्या धाकात तिला लग्नासाठी तयार केले. लग्नाच्या काही वर्षांत पतीच्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून तरुणीने आयुष्य संपविल्याची घटना धारावीत घडली. आत्महत्येपूर्वी तरुणीने भावाला व्हॉट्सअ‍ॅप करून, पतीलाही ध्वनिफीत पाठविल्याचे समोर आले. त्यानुसार, पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

माटुंगा लेबर कॅम्प येथे राहणाऱ्या नेहाचे (नावात बदल) २०१२ मध्ये इमारतीत राहणाºया रफिक मियो (३३) सोबत ओळख झाली. त्याच ओळखीतून संवाद वाढला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकले. याच दरम्यान रफिकच्या संशयी वृत्तीमुळे दोघांमध्ये खटके उडू लागले. २०१६ मध्ये याबाबत घरच्यांना समजताच त्यांनीही रफिकची समजूत काढली. मात्र, रफिक ऐकण्यास तयार नव्हता. पुढे चाकूच्या धाकात लग्नासाठी गळ घालण्यास सुरुवात केली. माझी नाही तर कुणाचीच नाही, म्हणून त्याने तिला त्रास देणे सुरूच ठेवले.

अखेर, लग्नानंतर सुधारेल, या आशेने त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच ती गरोदर राहिली. रफिककडून काळजी घेण्याऐवजी मारहाण सुरू झाली. बाळ झाले, तरीदेखील रफिकचा अत्याचार कमी झाला नाही. याच दरम्यान २३ मार्च, २०१९ रोजी नेहाने भावाला संदेश पाठवून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आणि आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी मुलीची समजूत काढून रफिकला समजावले. पुढे १४ जून रोजी पुन्हा नेहाने भावाला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश धाडला. त्यात, ‘रफिकमुळेमी खूप त्रासलेली असून, मला आत्महत्या करण्याकरिता रफिक भाग पाडत आहे. मी आत्महत्या केल्यास त्यास पूर्णत: रफिक जबाबदार असून, मी मेल्यानंतर माझा चेहरा रफिकला दाखवू नका व मुलास रफिककडे पाठवू नका,’ अशा आशयाचा मजकूर पाठवला.

कुटुंबीयांनीही तेव्हाही मुलीची समजूत काढली. पुढे ३० जानेवारी रोजी तिने तीन ध्वनिफीत तयार करून रफिकला पाठविल्या. या घटनांनतर रविवारी नेहाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.भावाने दिली तक्रार!आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी मोबाइल ताब्यात घेताच, त्यात या ध्वनिफीत मिळून आल्या. त्यानुसार, रफिकच्या अत्याचाराला कंटाळून नेहाने हे पाऊल उचलल्याची तक्रार तिच्या भावाने दिली आहे. त्यानुसार, रफिकविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत, शाहूनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याmarriageलग्न