शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:02 IST

कुठल्याही प्रकारच्या दुचाकीचा वापर न करता पायी चालत एक महिलेच्या समोरून येत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली.

नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही परिमंडळांमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने महिला वर्गांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इंदिरानगर, म्हसरूळ, आडगाव या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोलिसांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे. वारंवार राजरोसपणे घडणाऱ्या चेंनस्नचिंगच्या घटनांमुळे आता पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सोनसाखळी चोराने म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारच्या दुचाकीचा वापर न करता पायी चालत एक महिलेच्या समोरून येत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. ही घटना शनिवारी (दि.10) संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पेठरोडवरील न्यू हिरा हॉटेलसमोर घडली. फिर्यादी मुक्ता बादशाह घोटेकर(52, रा.शिवतेजनगर) या संध्याकाळी भाजीपाला खरेदी करुन पायी जात असताना वडाच्या झाडाजवळ त्यांच्या समोरुन आर टी ओ ऑफिस च्या दिशेने चालत एक पादचारी इसम आला व त्याने जवळ येताच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून सप्तरंग सोसायटीच्या बाजूने पळ काढला. या जबरी चोरीत चोरट्याने सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे 25ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात चोरट्याने कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा वापर केल्याचे दिसून आले नाही, बहुदा अशा पद्धतीने सोनसाखळी हिसकावण्याची ही पहिलीच घटना असावी, तरीदेखील चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

दुसरी घटना तासाभरात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. पाथर्डीफाटा परिसरातील नरहरी लॉन्सजवळून फिर्यादी पौर्णिमा राजेश पवार (39,रा. बिष्णोई अपार्टमेंट) यादेखील भाजीपाला खरेदी करून घरी पायी परतत असताना त्यांच्या समोरील बाजूने काळ्या रंगाच्या दुचाकीने दोघे अज्ञात इसम आले व त्यांच्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. सुमारे 60 हजार रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यानी घेऊन पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पुन्हा तिसरी घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली. फिर्यादी छाया विनायक पवार (48, रा. अमृतधाम) या पायी साडे आठ वाजेच्या सुमारास जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. यावेळी झटापटीत अर्धा तुटलेला 2100 रुपये किंमतीचा 3 ग्रॅमचे सोने घेऊन चोरटा फरार होण्यास यशस्वी झाला. 

भाजीपाला घेणाऱ्या महिला 'टार्गेट'

सोनसाखळी चोरट्यांनी आता सकाळी 'मॉर्निंग वॉक'ला जाणाऱ्या वृद्ध महिलाना टार्गेट न करता संध्याकाळी भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मध्यमवयाच्या महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे… कोरोनामुळे शक्यतो ज्येष्ठ महिला सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत नाही. यामुळे सोनसाखळी चोरट्यांनी सायंकाळच्या सुमारास विविध भागातील भाजी बाजाराच्या परिसरावर लक्ष ठेवत सोनसाखळी परिधान करून आलेल्या महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.  अशा घटना टाळण्यासाठी महिलांनी संध्याकाळी भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडताना आपले दागिने साडीच्या पदराखाली झाकून ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयित व्यक्ती नजरेस पडल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी व सतर्क राहावे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक