शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत एकाच रात्री चोरट्यांनी फोडली पाच दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:55 IST

शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली.

परभणी : शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील खानापूर फाटा भागात असलेल्या यशवंतनगरातील या चोरीच्या घटना घडल्या. १६ जुलै रोजी पहाटे साधारणत: अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दीपक कुचे यांच्या मालकीचे यशवंतनगरातील तुळजाभवानी मेडिकल या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील नगदी ३० हजार रुपये पळविले. त्याचप्रमाणे या दुकानाच्या बाजूलाच असलेल्या राजेंद्र येलपुल्ला यांच्या माऊली एंटरप्राईजेस या दुकानातील १ हजार रुपये, श्याम शिंदे यांचे युनिटी मेडिकेअर दुकानातील २ हजार रुपये आणि संतोष वगदे यांच्या शिवाणी रेडीमेड ड्रेसेस या दुकानातील २० रेनकोट, ३० जीन्स पॅन्ट, १० छत्र्या, अंडरविअरचे ६ बॉक्स असा २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.

तसेच वसमत रोडवरील जागृती कॉम्प्लेक्समधील शाल्वी लेडीज वेअर दुकानाचे शटर वाकवून १ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.  तसेच जुने आरटीओ कार्यालय परिसरातील कृषीधन इलेक्ट्रीक्स दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. एकाच रात्री सहा दुकान फोडल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी तुळजाभवानी मेडीकलचे मालक दीपक दीनानाथ कुचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे.कॉ.विठ्ठल राठोड, विनोद मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मुख्य रस्त्यापर्यंत काढला मागचोरीच्या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नृसिंह ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथकास पाचारण केले होते. श्वानाने दुकानांपासून ते वसमत रस्त्यापर्यंतचा माग काढल्याची माहिती तपासी अधिकारी हे.कॉ.विठ्ठल राठोड यांनी दिली.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातया परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे बोलेरो गाडी घेऊन हे चोरटे चोरी करण्यासाठी आले होते. चोरी करण्यापूर्वी चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. मात्र या कॅमेऱ्यात गाडीचा क्रमांक दिसत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

टॅग्स :theftचोरीParbhani Policeपरभणी पोलीसparabhaniपरभणी