शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

गुरू साटम टोळीच्या पाच गुंडांना अटक, खंडणीविरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 20:39 IST

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागत होते खंडणी; परदेशात बसून गुरु साटम आपली टोळी चालवतो   

मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुंड गुरु साटम टोळीच्या पाच जणांना आज जेरबंद केले आहे. बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या या पाच जणांकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे आणि अकरा मोबाईल हस्तगत केले आहेत. 

मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमक्या येत होत्या. गुरु साटम टोळीचे काही गुंड बांधकामाच्या साईटवर येऊन शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकवित होते. काही दिवस या व्यावसायिकाने या गुंडाना पैसे दिले. मात्र, दिवसेंदिवस त्यांच्या मागण्या वाढू लागल्याने हताश झालेल्या व्यावसायिकाने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय सावंत, पोलिस निरीक्षक सचिन कदम, अरविंद परमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सुनील पवार, सुशीलकुमार वंजारी, उपनिरीक्षक कल्पेश देशमुख यांच्या पथकाने धमकाविणाऱ्यांचा मग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक पुरावे व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोल विचारे, भरत सोलंकी उर्फ अन्वर, राजेश आंब्रे उर्फ भाई, बिपीन धोत्रे, दीपक लोढीया उर्फ सोनी या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. आरोपी अमोल याला खुनाच्या आरोपाखाली याआधी अटक करण्यात आली होती. तर राजेशविरोधात ५० हुन अधिक गुन्हे दाखल असून तो थेट साटमच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. दीपक आणि अमोल याच्यावर धमकाविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच  भरत सोलंकी हा पालिकेत सफाई कर्मचारी आहे. पालिकेत नोकरी करताना व्यावसायिकांची माहिती काढून देण्याचे काम भरत करायचा अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. पुढे त्यांनी  बिपीन हा आर्थिक व्यवहार सांभाळून परदेशात साटमला पैसे पुरविण्याचे काम करतो. यावरून परदेशात बसून गुरु साटम आपली टोळी चालवीत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.  या पाच जणांकडे गुरु साटम याने  मुंबईतील  व्यावसायिकांची यादी दिली होती. त्यानुसार पाच जणांची खंडणीवसुली सुरु होती. या पाच जणांनी मुंबईसह बाहेरच्या व्यावसायिकांना धमकाविल्याचे उघड झाले आहे. पाच आरोपीना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे असे सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईArrestअटक