शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुकीम अहमद, शफी कादरी यांच्या हत्येसाठी दिली पाच लाखांची सुपारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:43 IST

अकोला : आप नेते मुकीम अहमद व शफी कादरी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात एक आणखी नवे वळण समोर आले, या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली कुद्दुस मेकॅनिक व शादाब टाटा यांनी सोमवारी पोलिसांसमोर दिली.

ठळक मुद्दे न्यायालयाने आरोपींना २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या दोघांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आप नेते मुकीम अहमद व शफी कादरी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात एक आणखी नवे वळण समोर आले, या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली कुद्दुस मेकॅनिक व शादाब टाटा यांनी सोमवारी पोलिसांसमोर दिली. या हत्याकांड प्रकरणाचे सूत्रधार कौसर व चांद या दोघांनी ही सुपारी दिली असून, त्यामधील १ लाख २० हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही या दोघांना देण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या दोघांना रविवारी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दामले चौकातील केदार मंदार अपार्टमेंटमधील रहिवासी मुकीम अहमद व बुलडाण्याच्या साखरखेर्डा या गावातील त्यांचा सहकारी शफी कादरी हे अकोला शहरातून ३० जुलै रोजी बेपत्ता झाले होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सहा पथकांचे गठन करून, या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, दोघांचेही मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील साकर्शा जंगलात आढळले होते. या दोघांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली असून, यामधील चार जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर १० आरोपींपैकी रविवारी अटक केलेल्या अकोट फैलातील मेकॅनिकचा व्यवसाय करणारा अब्दुल कुद्दुस अब्दुल मन्नान व त्याचा साथीदार शेख शादाब टाटा या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांना कौसर व चांद या मुख्य सूत्रधांरानी मुकीम अहमद व शफी कादरी या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी दिल्याचे त्यांनी कबुली दिली. कुद्दुस मेकॅनिक याने नवीन टोळी तयार केल्याचेही समोर आले आहे. या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये अहमद खान भुरे खान, शेख इरशाद व रजा उल्लाह शाह यांचा समावेश आहे.

सूत्रधारांनी केला पूर्ण अभ्यास या हत्याकांड प्रकरणाचे सूत्रधार कौसर व चांद यांनी मुकीम अहमद व शफी कादरी या दोघांची दिवसभराच्या कामकाजासह त्यांच्या पाठीमागे व सोबत राहणाऱ्यांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी विविध गटातील १५ ते २० जणांना सहभागी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली असली, तरी आणखी ४ ते ५ आरोपींना अटक करणे बाकी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून