शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

बनावट सातबारा दाखवून पाच लाखांची फसवणूक , आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:44 IST

बनावट सातबारा उतारा दाखवून पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या दिनेश भोईर (२८, रा. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली आहे.

ठाणे  - बनावट सातबारा उतारा दाखवून पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या दिनेश भोईर (२८, रा. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली आहे. ठाणेनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील रहिवासी असलेल्या भोईर याने त्याच्या ठाणे जिल्ह्यातील शिरगाव (ता. अंबरनाथ) येथील जमीन मालकीची असल्याचा बनावट सातबारा उतारा मुंबईतील कलीम खान (३८) यांना दाखवला. त्यानुसार, या उता-यावरील ४.२ गुंठे जमिनीचा व्यवहार २२ लाख रुपयांना ठरवून तसे खरेदीखतही त्यांनी केले. त्यानंतर, खान यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन उर्वरित १७ लाख रुपये तीन महिन्यांच्या कालावधीत द्यायचे ठरवून बनावट सातबारा उता-यावर व्यवहार केला. याच व्यवहारातून स्वत:च्या नावावर नसलेल्या जमिनीचा बनावट सातबारा उतारा तयार करून ती जमीन आपली असल्याचे भासवून तिच्या खरेदीच्या मोबदल्यात खान यांच्याकडून ९ जुलै २०१५ रोजी ठाण्याच्या कोर्टनाका येथे पाच लाख रुपये घेतले.आपले पैसे परत न मिळाल्याने खान यांनी याप्रकरणी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केल्यानंतर भोईरला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी