शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी

By जितेंद्र कालेकर | Updated: July 15, 2025 00:26 IST

ठाणे महापालिकेच्या शाळेजवळ सोमवारी सकाळी घडला प्रकार

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शहरातील सावरकरनगर, यशोधननगर आणि लोकमान्यनगर या भागातील नववी आणि दहावीतील १६ ते १७ वयोगटातील पाच विद्यार्थिनींचा एका विकृत तरुणाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार साेमवारी सकाळी घडला. या घटनेनंतर आरोपीने पलायन केले असून त्याच्या अटकेची मागणी परिसरातील पालकांनी वर्तकनगर पोलिसांकडे केली. आरोपीच्या शोधासाठी एका पथकाची निर्मिती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरडी वाघचवरे यांनी दिली.

सावरकरनगर भागातील ठाणे महापालिकेच्या शाळेजवळ सोमवारी (१४ जुलै) सकाळी ७.३० ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान विनयभंगाचा प्रकार घडल्याची तक्रार एका १६ वर्षीय पीडितेने वर्तकनगर पोलिसांना दिली. या तरुणीशी त्या तरुणाने साधारण १५ ते २० मिनिटे लगट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शाळेच्या आवारापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर घडल्याचेही पीडितेने सांगितले. तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पालकांनी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर काही अंतराने अन्य चार विद्यार्थिनींसोबत त्याच तरुणाने असेच गैरकृत्य केल्याचे उघड झाले. पाचही घटनांमधील आरोपीचे वर्णन एकच असून विनयभंग- बीएनएस कलम ७४ आणि पोक्सो कलम ८-१२ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMolestationविनयभंग