शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेरा फसवणूकप्रकरणी पाच बिल्डरांना अटक, एसआयटीने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:49 IST

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वैधरीत्या बांधकाम परवानगी मिळालेली नसताना, खोट्या सही-शिक्क्याचा वापर करून ६५ प्रकरणांत बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) यांची फसवणूक केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) पाच बिल्डरांना बुधवारी अटक केली आहे. मुकुंद मिलिंद दातार, सुनील बाळाराम मढवी, आशू लक्ष्मण मुंगेश, रजत राजन आणि राजेश रघुनाथ पाटील अशी या बिल्डरांची नावे आहेत.

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वैधरीत्या बांधकाम परवानगी मिळालेली नसताना, खोट्या सही-शिक्क्याचा वापर करून ६५ प्रकरणांत बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आले. माहिती अधिकारात वास्तूविशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात महापालिकेच्या तक्रारीवरून डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिसांत ६५ बिल्डरांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची एसआयटी व इडीकडूनही चौकशी सुरू आहे. 

दरम्यान, पाटील यांच्या जीवास धोका असल्याने त्यांनी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांना अद्याप ते मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी कल्याण न्यायालयात आपला जबाब नोंदविला आहे. त्यानंतर बुधवारी एसआयटीने पाचजणांना अटक केली आहे.

खोटी कागदपत्रे बनवणाऱ्यांना झाली होती अटक-     या प्रकरणात खाेटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन आणि कैलास गावडे या पाच जणांना ५ नाेव्हेंबरला अटक केली हाेती. -     दाेन दिवसांच्या पाेलीस काेठडीनंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत केली हाेती.-     या पाच जणांकडून आठ संगणक जप्त केले. पाच जणांशी संबंधित १६ बँक खाती गाेठविण्यात आली.-     यापूर्वी बिल्डरांची ४० बँक खाती गाेठविली हाेती. 

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी