शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

सर्च ऑपरेशनच्या चार तासांच्या थरारात पाच आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:04 IST

Five accused arrested in four hours of search operation : अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षकांसह ८४ अधिकारी कर्मचारी दधम-जयराम गड शिवारात सैरावैरा धावले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अंत्रज येथील कोंबींग ऑपरेशननंतर सोमवारी पोलिसांनी दुसरे स्पॉट सर्च ऑपरेशन यशस्वी केले. वैशाखाच्या उकाड्यात...अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात सहा किलोमीटर परिसराचा माळरान पोलिसांनी धावत पालथा घातला. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षकांसह ८४ अधिकारी कर्मचारी दधम-जयराम गड शिवारात सैरावैरा धावले. सराईत गुन्हेगारांच्या दगडफेकीला न जुमानता पोलिसांनी जीवावर उदार होत पाच गुन्हेगारांना चार तासांच्या थरारानंतर पकडलेच. खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी...मांडूळ साप...कमी किमतीत महागडी गाडी अशा प्रकारचे आमिष दाखवून लुटणाऱ्या दुसऱ्या एका टोळीचा खामगाव पोलिसांनी पर्दाफाश केला.  अटक करण्यात आलेल्या सर्वच आरोपींवर राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. एकावर कर्नाटक आणि इतर राज्यातही गुन्हे दाखल आहेत. अंत्रज, हिवरखेड, रोहणा, कंझारा येथील सराईत गुन्हेगार आणि एकाच पद्धतीने फसवणूक करण्याचा पॅटर्न असलेल्या तीन टोळक्यांचे मुसके आवळल्यानंतर आता खामगाव तालुक्यातील  जयरामगड, दधम, प्रिंपी धनगर परिसरात वास्तव्य आणि लुटमारी करण्याचे प्राबल्य असलेल्या दुसऱ्या टोळीच्याही नांग्या ठेचल्या. 

 

वैशाख वणव्यात डोंगरात चार तासांचा थरार! अंगाची काहिली करणारे उन्ह...पाणी पाणी करणारा जीव घेऊन खामगाव उपविभागीय पोलिसांच्या १४ अधिकाऱ्यांसह ६८ कर्मचाऱ्यांचे पथक या सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करीत होते. कधी पोलीस पुढे तर कधी गुन्हेगार पुढे अशा प्रकारच्या थरार नाट्यात अखेर पोलिसांची जीत झाली.  सराईत गुन्हेगार स्वत:च्या बचावार्थ डोंगराळ माळरान आणि रानावनात सैरावैरा धावत होते. कधी पोलिसांवर दगडफेक करीत होते. तर कधी शस्त्रांचा धाक दाखवित पोलीस कारवाई टाळण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत गुन्हेगारांचा पाठलाग करून आरोपींना जेरीस आणले. 

 

खामगाव आणि परिसरात नकली नाणी आणि विविध माध्यमांद्वारे फसवणूक  करणे. लुटमार करून दहशत निर्माण करणे अशा सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सांघिक प्रयत्नांना चार तासांच्या थरारानंतर यश आले.  - हेमराजसिंह राजपूतअपर पोलीस अधीक्षक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस