शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ही माझी दुसरी बायको! नवऱ्यानं पहिल्या बायकोला करून दिली ओळख; पहिल्या बायकोकडून जोरदार 'स्वागत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 12:11 IST

पहिली बायको आणि तिच्या भावांकडून नवरदेवाचं जोरदार स्वागत

लखीसराय: दोन बायका अन् फजिती ऐका याचा प्रत्यय बिहारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आला आहे. लखीसरायमध्ये वास्तव्यास अससेल्या एका विवाहित पुरुषाला दुसरं लग्न करणं महागात पडलं आहे. दोन्ही पत्नींनी मिळून झाडू आणि चपलांनी त्याची धुलाई केली आहे. लखीसरायच्या मेदनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमरपूर गावात हा प्रकार घडला. आरोपीला एक पत्नी आणि तिच्याकडून एक मुलगी असताना त्यानं दुसरा विवाह केला. आरोपी रुपेश कुमार नव्या नवरीला घेऊन घरी आला. त्यानं त्याच्या पहिल्या पत्नीला तिचं स्वागत करण्यास सांगितलं. त्यामुळे दुसरी पत्नी संतापली. तिनं तिच्या भावांना बोलावलं. सगळ्यांनी मिळून झाडू, चपलांनी रुपेशची धुलाई केली. रुपेशच्या दुसऱ्या पत्नीनंदेखील त्याला बदडलं. तिथे उपस्थित असलेल्या एकानं घटनेचं चित्रीकरण केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.३ बायका फजिती ऐका! मुलानं 'पप्पा' म्हणून हाक मारताच पठ्ठ्याचं सगळं बिंग फुटलं, त्यानंतर जे घडलं...रुपेश कुमारचा पहिला विवाह तीन वर्षांपूर्वी झालं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे. मात्र तरीही रुपेशनं दुसरा विवाह केला. मुंगेर जिल्ह्यातील धरहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाहाचौकी गावात त्यानं स्वत: अविवाहित असल्याचं सांगून लग्न केलं. यानंतर तो नव्या नवरीला घेऊन पहिल्या पत्नीकडे आला. घरी पोहोचल्यावर नव्या नवरीला तिची फसवणूक झाल्याचं समजलं. तिनं सोबत राहण्यास नकार दिला. दुसऱ्या पत्नीनंदेखील तिच्या भावाला बोलावलं. त्यानंतर सगळ्यांनी मिळून रुपेशची धुलाई केली.