शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पर्यटन मौसमच्या पहिल्या आठवडय़ातच गोव्यात 23.67 लाखांचे ड्रग्स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 20:52 IST

किनारपट्टी भागात ड्रग विक्रेते सक्रीय, आतापर्यंत दोन विदेशी नागरिकांसह 9 जणांना अटक

सुशांत कुंकळयेकरमडगाव -  गोव्यात पर्यटन मौसम सुरु होऊन एक आठवडा देखील उलटला नसताना अमली पदार्थ पकडण्याची तब्बल 9 प्रकरण उघडकीस आली असून या पहिल्या आठवडय़ातच एकूण 23.67 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थविरोधी मोहीम राबवून एएनसी विभागाने गोव्यातील किनारपट्टीवर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे.गोव्यात 4 ऑक्टोबरपासून पर्यटन मौसम सुरु झाला. मात्र, 3 ऑक्टोबरपासून अमली पदार्थ पकडण्याची मोहीम सुरु झाली आहे. आतापर्यंत 9 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन विदेशी नागरीक, सहा गोवाबाहेरुन आलेले पण गोव्यात स्थायिक झालेले तर एका गोमंतकीय तरुणाचा समावेश आहे. समुद्र किनारे ते दाबोळीचा विमानतळ या सर्व पट्टय़ात हा व्यवसायाचे मोठे जाळे पसरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.तीन दिवसांपूर्वी दाबोळी विमानतळावर मस्कतला जाण्यासाठी विमानात चढण्यासाठी आलेल्या अल फराह (वय २५) युवकाला पकडण्यात आले होते. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्या सामानात लपविलेला 8 लाखांचा चरस पोलिसांना सापडला होता. या अमली पदार्थाचे वजन दोन किलो होते. हा अमली पदार्थ नेमका कुठे जात होता याचा तपास सध्या चालू आहे. 5 ऑक्टोबरला अंजुणा येथे स्थानिक पोलिसांनी संशयावरुन ओबे सानी या नायजेरियन युवकाला अटक केली असता त्याच्याकडेही 35 हजार रुपयांचा चरस सापडला होता.अमली पदार्थ विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात हा व्यवसाय अधिक फोफावला असून 4 ऑक्टोबरला वागातोर येथे एएनसीने घातलेल्या धाडीत हिमाचल प्रदेशच्या लालदास याच्याकडे 5.50 लाखांचा चरस सापडला होता. त्याच दिवशी कळंगूट पोलिसांनी प्रणव पटेल या 22 वर्षीय गुजराती युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 1.30 लाखांचा चरस सापडले होते. दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी उत्तर गोव्यातील हरमल किनाऱ्यावर एएनसीने धाड घातली असता कुलू हिमाचल प्रदेश येथील मोहनलाल याच्याकडे 5.65 लाखांचा चरस सापडला होता. याशिवाय 6 ऑक्टोबरला हरमल येथे महंमद जोहेब खान याला अटक केली असता त्याच्याकडे 20 हजाराचा चरस सापडला होता. विमानतळाप्रमाणोच रेल्वे स्थानकावरही अमली पदार्थ पोचले असून दोन दिवसांपूर्वी कोंकण रेल्वे पोलिसांनी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर संशयावरुन सतीश रेड्डी या मूळ तमिळनाडूच्या पण सध्या वास्को येथे रहाणाऱ्या युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 45 हजाराचा गांजा सापडला. 3 ऑक्टोबरला मायणा-कुडतरी पोलिसांनी रामनगरी येथे घातलेल्या धाडीत जफर शेख या दवर्लीच्या युवकाकडे चार हजारांचा गांजा सापडला होता. तर 6 ऑक्टोबर रोजी फोंडा पोलिसांनी शिरोडा येथे संशयावरुन साईश नाईक या 22 वर्षीय मडकईच्या स्थानिक युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 85 हजाराचा गांजा सापडला होता.एएनसीचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर किनारपट्टी भागात अमली पदार्थाची विक्री सुरु होते याची माहिती पोलिसांना असल्याने किनारपट्टीवरील गस्त अधिक कडक केल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात गांजा पकडण्याचे प्रमाण वाढण्यामागचे कारण स्पष्ट करताना बहुतेक कामगार वर्गामध्ये गांजा ओढण्याचे प्रमाण अधिक असल्याने ज्या ठिकाणी कामगार वर्ग अधिक आहे. त्या भागात असे प्रकार सापडले आहेत असे त्यांनी सांगितले. एएनसीबरोबरच इतर ठिकाणच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थgoaगोवा