शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार, मग सोशल माध्यमांवर बदनामी

By योगेश पांडे | Updated: April 9, 2023 16:43 IST

निर्वाणीचे विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल मजकूर तसेच घाणेरडे फोटो टाकून तिची बदनामी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगोदर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने एका महिलेची सोशल माध्यमांवर फोटो टाकून बदनामी केली. पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद इर्शाद फारूक अन्सारी (२३, हिवरी नगर, नंदनवन) या आरोपीला अटक केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

संबंधित ३० वर्षीय महिलेची आरोपीसोबत मैत्री झाली. त्याने तिच्या प्रेम असल्याची बतावणी केली व लग्न करण्यासाठी प्रपोज केले. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने अनेकदा असा प्रकार केला.

महिलेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता तो नेहमी टाळाटाळ करायचा. अखेर चिडून जाऊन महिलेने त्याचा निर्वाणीचे विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल मजकूर तसेच घाणेरडे फोटो टाकून तिची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर महिलेला मोठा धक्का बसला. तिने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

टॅग्स :Molestationविनयभंग