शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आधी पत्नीला ठार मारले, मग पतीने उचलले टोकाचे पाऊल

By दिपक ढोले  | Updated: May 12, 2023 21:54 IST

पती संजय हा मनोरूग्ण असल्याची पोलिसांची माहिती

दीपक ढोले, जालना: कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीला घरात कोंडून रॉडने मारहाण करून खून केला. नंतर स्वत: शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे शुक्रवारी घडली. संगीता संजय पवार वय (३२), संजय अंकुश पवार (३५) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संजय पवार हा पत्नी संगीता हिला कौटुंबिक वादातून घर आतून बंद करून मारहाण करत होता. तेव्हा त्यांची तीन मुले घराबाहेर खेळत होती. पत्नीला मारहाण सुरू असताना शेजारी राहणाऱ्या या नातेवाईकांनी दार उघडण्याचा व संजय याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी रॉड संगीता हिच्या डोक्यात मारला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. पत्नी मरण पावल्याचे लक्षात येताच संजय घरातून बाहेर पडला. त्याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंठा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मंठा ग्रामीण रुग्णालयात हलविले. परतूरचे उपविभागीय पाेलिस अधिकारी राजू मोरे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संजय हा मनोरूग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी