शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिलीच घटना : बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 22:10 IST

संपादीत जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ; अन् न्यायालयाच्याही आदेशाचे उल्लंघन

ठळक मुद्दे सायंकाळी विलास पाटील यांची तीन दिवसासाठी कारागृहात (दिवाणी कैद) रवानगी करण्यात आली.या कारवाईमुळे भूसंपादन प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव -  तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ  करुन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास ब्रिजलाल पाटील (वय ४५,रा.जळगाव) यांना बुधवारी दुपारी न्यायालयाच्या आदेशाने अटक करण्यात आली.

दरम्यान, भुसंपादन प्रकरणात कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. सायंकाळी विलास पाटील यांची तीन दिवसासाठी कारागृहात (दिवाणी कैद) रवानगी करण्यात आली.

तालुक्यातील म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी जमीन भुसंपादनाची अधिसुचना ३० एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली होती. यानंतर संपादीत केलेल्या जमीनींचा निवाडा ३१ डिसेंबर २०१२ रोजी घाेषीत झाला. शेतकरी भूषण दत्तात्रय चिंचोरे, रामराव नाटु पाटील, शकुंतला सुरेश पोरवाल व सुरेश पुंडलीक पाटील या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन कायदा कलम १८ प्रमाणे न्यायालयात खटला (रेफरन्स) दाखल केला होता.६ मार्च २०१९ रोजी न्यायालयाने निकाल देतांना शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर केला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव मोबदला दिला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

पावणे दोन कोटीचे धनादेश जप्तविषेश भुसंपादन अधिकारी यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नावाने दिलेले १ कोटी ७५ लाख रुपयांचे धनादेश जप्त केलेले आहेत. त्यानंतरही संबधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात पैसे भरले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने ११ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांचे बँक स्टेटमेंट व स्थावर मिळकतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची बजावणी १४ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आली. तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कैदी वॉरंट बजावण्यात आले. बुधवारी न्यायालयाचे बेलीफ चंदनकर यांनी विलास पाटील यांना अटक करुन न्यायाधीश शशिकांत फड यांच्या न्यायालयात हजर केले. शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड.एन.आर.लाठी यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे भूसंपादन प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :ArrestअटकCourtन्यायालयJalgaonजळगावpwdसार्वजनिक बांधकाम विभाग