शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

फिरोज नाडियादवाला यांना 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 18:56 IST

वेळेत टॅक्स न भरल्याप्रकरणी बॅलार्ड पियर मॅजिस्ट्रेट कोर्टाने नाडियादवालांना शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्दे८. ५६ लाख रुपये जमा करण्यास एक वर्षाचा विलंब केल्याप्रकरणी फिरोज नाडियादवालांना तीन महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे.२००९ - २०१० या वर्षात व्यवसाय कमी झाल्यामुळे कर भरण्यास उशीर झाल्याचं नाडियादवाला यांनी स्पष्टीकरण दिले.

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांना तीन महिन्यांचा सश्रम कारावास ठोठावण्यात आला आहे. वेळेत टॅक्स न भरल्याप्रकरणी बॅलार्ड पियर मॅजिस्ट्रेट कोर्टाने नाडियादवालांना शिक्षा सुनावली आहे.

८. ५६ लाख रुपये जमा करण्यास एक वर्षाचा विलंब केल्याप्रकरणी फिरोज नाडियादवालांना तीन महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. २००९ - २०१० या आर्थिक वर्षात कर भरण्यास नाडियादवालांनी दिरंगाई केली होती.उशिराने रक्कम भरल्याने गुन्हेगारी दायित्व कमी होत नाही, असं बॅलार्ड पियर मॅजिस्ट्रेट कोर्टाने म्हटलं आहे. २००९ - २०१० या वर्षात व्यवसाय कमी झाल्यामुळे कर भरण्यास उशीर झाल्याचं नाडियादवाला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये चित्रपट निर्मिती केली नाही, मात्र जुन्या चित्रपटांच्या विक्रीमुळे आपलं उत्पन्न स्थिर राहिलं होतं. परंतु टीडीएस भरण्यास उशीर झाला असा नाडियादवाला यांनी कोर्टात दावा केला. मात्र हा दावा कोर्टाने फेटाळून लावला आहे. मार्च २०१४ मध्ये एका आयकर अधिकाऱ्याने फिरोज नाडियादवालांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दिलेल्या वेळेत टॅक्स न भरल्याचं योग्य कारण नाडियादवाला देऊ शकले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी वेलकम, वेलकम बॅक, फिर हेराफेरी, हेराफेरी 3, दिवाने हुए पागल, आवारा पागल दिवाना, आन यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयTaxकरIncome Taxइन्कम टॅक्स