शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 14:09 IST

Firing Case : या गुन्हयाचे तपासकामी सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले होते.

ठळक मुद्देराजस्थान, जयपुर जिल्हयातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला.कमलेशने आदित्य यांना जीवे ठार मारण्याकरिता एका व्यक्तीला सुपारी दिली त्यानुसार दोन व्यक्तींनी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर जीवघेणा हल्ला केला.

कल्याण: राजस्थान येथील व्यापाऱ्यावर जीवे मारण्याची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक केली. कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. राजस्थान, जयपुर जिल्हयातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला.

जैन हे त्यांची गाडी साफसफाई करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलातून त्यांच्यावर तीन गोळया झाडल्या. यातील एक गोळी जैन यांच्या हाताला लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत त्यांनी तेथील करणी विहार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. यावेळी पोलीसांनी केलेल्या चौकशीत आदित्य हे त्यांचे कुटुंबासह 2018 ते 2020 या कालावधीत डोंबिवलीत राहत होते. त्या दरम्यान डोंबिवली येथे राहणारा कमलेश शेषराव शिंदे हा नेहमी त्यांचे दुकानात येत जात असायचा. यात तो आदित्य यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करून तिला त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून आदित्य कुटुंबासह राजस्थान येथे राहण्यास गेले. परंतू कमलेशने आदित्य यांना जीवे ठार मारण्याकरिता एका व्यक्तीला सुपारी दिली त्यानुसार दोन व्यक्तींनी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर जीवघेणा हल्ला केला.

या गुन्हयाचे तपासकामी सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले होते. त्यांनी दिलेल्या माहीतीवरून या गुन्हयाचा तपास कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाकडून संयुक्तपणो करण्यात आला. यात पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन, मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के, अजितसिंग राजपूत यांच्यासह उल्हानगर गुन्हे पोलीसांनी कसोशीने तपास करीत हत्येची सुपारी देणा-या कमलेशला डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा येथून ताब्यात घेतले. आरोपीला  राजस्थान पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांनी दिली.

टॅग्स :Firingगोळीबारkalyanकल्याणPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीRajasthanराजस्थानulhasnagarउल्हासनगर