अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घढली आहे. गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. दिशा पटानीचे वडील, निवृत्त उपअधीक्षक जगदीश पटानी हे या घरात राहतात. शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास, सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतीवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार-पाच राउंड फायर केले. मात्र, यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यांच्या घराबाहेर तत्काळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, एसपी सिटी आणि एसपी क्राईम यांच्या नेतृत्वाखाली, कारवाईसाठी पाच पथके तयार करण्यात आली.
रोहित गोदारा आणि गोल्डी बराड टोळीने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी एका फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिशाची बहीण खुशबू पाटनीने प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांचा बदला घेण्यात आला आहे. याच बरोबर, कुणीही संत आणि धर्माविरोधात भाष्य केले, तर त्याने त्याच्या परिणामांसाठी तयार रहावे. मात्र आता, ही पोस्ट डेलिट करण्यात आली आहे.
रोहित गोदारा आणि गोल्डी बराड यांनी सांगितलं, हल्ल्याचं कारण - पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे की, ''बंधूंनो, आज खुशबू पटणी/दिशा पटणी यांच्या घरी झालेला गोळीबार ही एक कारवाई आहे. तिने आपले पूज्य संत प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराजांचा अपमान केला. तिने आपल्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पूज्य देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा केवळ एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी कोणी आपल्या धर्मासंदर्भात कुठल्याही प्रकरे अपमाण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या घरातल्या कुणालाही जिवंत सोडणार नाही.'
काय आहे प्रकरण? -काही महिन्यांपूर्वी दिशा पटानीची बहीण खुशबूने एक व्हिडिओ तयार केला होता. ज्यात, ती प्रेमानंद जी महाराजांसंदर्भात बोलल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर, तिने आणखी एक व्हिडिओ तयार करत, त्या व्हिडिओचा संबंध प्रेमानंद यांच्याशी जोडणाऱ्यांवर टीका केली होती. खुशबू म्हणाली होती की, तिचा व्हिडिओ प्रेमानंद जी महाराजांसाठी नाही, तर अनिरुद्धाचार्य यांच्यासंदर्भात होता. अनिरुद्धाचार्य यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांसंदर्भात भाष्य केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. यावरून खुशबूने अनिरुद्धाचार्य यांच्यासंदर्भात भाष्य केले होते.