शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत चोरांचे थैमान, मोबाईल पळवून तरुणावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 20:52 IST

कामाक्षा प्रसाद साहू (30) असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.  

ठळक मुद्दे  भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत.  

भिवंडीभिवंडी शहर व ग्रामीण भागात चोरी, लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. कामाक्षा प्रसाद साहू (30) असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.  चोरांनी तरुणावर तीन वेळा गोळीबार केला. या गोळीबारात युवाकाला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. भिवंडीनजीकच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. कामाक्षा हा तरुण भिवंडी तालुक्यातील भादवड येथील तरे कंपाऊंड येथे एका मित्राला भेटायला जात होता. त्यावेळी एका मोटरसायकलवरून तीन चोरटे त्या ठिकाणी आले. चोरट्यांनी कामाक्षाला रस्त्यात अडवून त्याच्या जवळ असलेला मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याच्या खिशातील पैशाचे पाकीटही काढून घेतले. खिशातील पैशाचे पाकिट हिसकावल्यानंतर कामाक्षाने चोरट्यांना विरोध केला असता पाच ते दहा मिनिटे त्यांच्यात बाचाबाचीही झाली. दरम्यान, एका चोरट्याने कामाक्षाला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि तिथून पळ काढू लागले. परंतु तरुणाने मोठ्या धाडसाने या चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला पकडून ठेवले होते. आपल्या साथीदाराला पकडून ठेवल्याने दुसऱ्या चोरट्याने त्याच्याजवळची बंदूक काढून तरुणावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या तरुणाच्या मांडीत लागल्या आणि  त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. स्थानिकांनी लगेच त्या तरुणाला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे भिवंडी तालुका पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत.  

 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसbhiwandiभिवंडीRobberyदरोडाMobileमोबाइल