शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोरोना निर्बंधांचा भंग करणे भोवले, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 08:00 IST

Tiger Shroff & Disha Patani: कोरोनाकाळात नियमभंग करणे टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना चांगलेच भोवले असून, कोविड-१९ संबंधीचे निर्बंध मोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध झुगारून बँडस्टँडवर फिरत असलेल्या टायगर श्रॉफ  (Tiger Shroff ) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांना काल मुंबई पोलिसांनी रोखले होते. दरम्यान, कोरोनाकाळात नियमभंग करणे या दोघांना चांगलेच भोवले असून, कोविड-१९ संबंधीचे निर्बंध मोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (An FIR has been registered against actors Tiger Shroff, Disha Patani & others for violating COVID-19 restrictions)

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफआणि अभिनेत्री दिशा पटानी अनेकदा एकत्र दिसून येत असतात. हे दोघेही डिनर डेट्स, ड्राइव्ह आणि पार्टीमध्ये एकत्र असतात. दरम्यान, काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात ते कारमधून फिरत होते. त्यावेळी पोलिसांनी टायगर आणि दिशाला रोखले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही आधारकार्ड तपासले. तसेच अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून दिले होते. मुंबई पोलिसांनी केलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली होती.  

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी संध्याकाळी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे जिममधून परतत होते. त्याचदरम्यान दोघेही फिरण्यासाठी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बँडस्टँड येते पोहोचले. येथे ते कारमधून दुसरी फेरी मारत असतानाच पोलिसांनी अचानक त्यांना रोखले होते. 

 टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी बागी-२ आणि बागी-३ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्याशिवाय एका म्युझिक व्हिडीओमध्येही ते एकत्र दिसले आहेत. तसेच हल्लीच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या राधे या चित्रपटामध्येही दिशा दिसली होती.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtiger Shroffटायगर श्रॉफDisha Pataniदिशा पाटनीMumbai policeमुंबई पोलीस