शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या आजी माजी संचालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:02 IST

 गैरव्यवहार, अपहार दडविण्यासाठी नष्ट केले कागदपत्रं

ठळक मुद्दे४७ जणांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई -  येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांसह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, अपहार दडवण्याच्या उद्देशाने संस्थेचे रेकॉर्ड नष्ट केल्या प्रकरणी ४७ जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था ही विविध घोटाळे, अपहार व गैरव्यवहारांमुळे कायम चर्चेचा विषय ठरलेली आहे. या पतसंस्थेतील आजी व माजी संचालकांनी सन २००० ते २०१२ पर्यंतच्या कालावधीत संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार, अपहार दडवण्याच्या उद्देशाने संस्थेचे रेकॉर्ड हेतूपुरस्सर नष्ट केलेले आहे. लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे परीक्षण करण्यासाठी वारंवार रेकॉर्ड मागितले. मात्र, ते उपलब्ध करून देण्यात आले नाही. या मागणीसाठी  पतसंस्थेच्या काही सभासदांनी रेकॉर्ड उपलब्ध करून द्या. या मागणीसाठी उपजिल्हा निबंधक कार्यालयासमोर विविध मार्गाने आंदोलन केले. मात्र, या संदर्भात कसलीही दखल घेण्यात आली नाही. वारंवार मागणी करूनही पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्याने जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब फासे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ४७ आजी माजी संचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध कलम १७५, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे करीत आहेत.

यांच्यावर झाले गुन्हे नोंद : सुदामती राजमाने, प्रभाकर आरसुडे, मुजीब कुरेशी, महादेव मुंडे, विक्रम दौंड, मोहन गंगणे, हनुमंत काळम, गंगाधर केलुरकर, देविदास तरकसे, मनिषा इंगे, अनंत निकते, अशोक कोपले, संजय नागरगोजे, गिरीधर देशमुख, बालासाहेब मोरे, दादासाहेब पवार, रामराजे आव्हाड, सुनिता काशीद, सूर्यकांत धायगुडे, अंगद घुले, हरिश्चंद्र चाटे, व्यकंटेश गायकवाड, सुनिल धपाटे, शिवहर भताने, शर्मा गायकवाड, सुनिल म्हेत्रे, प्रभावती अवचर, आशालता बोळे, पांडुरंग पांडे, सर्जेराव काशीद, विनायक चव्हाण, भगवान गडदे, संजीव उमाप, वैजेनाथ अंबाड, शशिकांत बडे, रेखा टाक, शैला जाधव, बाळासाहेब बनसोडे, राजेसाहेब सोमवंशी, मन्मथ पोखरकर, शिवहर आकुसकर, रामभाऊ भगत, संजय वाघमारे, बाळकृष्ण चाटे या शिक्षक  संचालक व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbankबँक